Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाला सापडलाय तिचा ‘प्रिन्स चार्मिंग’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 11:23 IST

श्रद्धा कपूरचे करिअर सध्या एकदम सुसाट आहे. ती बॉलीवूडमधील सर्वांत तरूण अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्यासोबतच आलिया भट्टही सध्या फॉर्मात ...

श्रद्धा कपूरचे करिअर सध्या एकदम सुसाट आहे. ती बॉलीवूडमधील सर्वांत तरूण अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्यासोबतच आलिया भट्टही सध्या फॉर्मात आहे. २०१० पासून तिने करिअरला सुरूवात केली आणि आता सहा वर्षांच्या काळात तिने नव्या पिढीसमोर स्वत:चे उदाहरण ठेवले आहे.पण, तिचे वैयक्तिक आयुष्य सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. एका मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की,‘ तुला तुझा प्रिंन्स चार्मिंग मिळाला आहे काय? तेव्हा या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणते, ‘ आता कुठे माझ्या करिअरला सुरूवात झालीय. अभी दिल्ली दूर है...मी अजून सिंगल आहे.’आदित्य रॉय कपूरसोबत सध्या तिचे नाव घेतले जात असल्याने ती परेशान आहे. ती म्हणते,‘ मी अजून सिंगल असून अफवा या फार जुन्या आहेत.’ श्रद्धा याअगोदर ‘बागी’ चित्रपटात दिसली होती. सध्या ती ‘ओके जानू’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.