Join us

हेमा, रेखा, जया और सुषमा नंतर आता हृतिक...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 17:47 IST

what will happen now to Hema, Rekha, Jaya aur Sushma? ; हेमा, रेखा, जया और सुषमा असे स्लोगन असणाºया एका डिटेर्जेंट पावडरची जाहिरात हृतिक रोशनने केली आहे. या जाहिरातीचा फोटो ट्विटरवर चांगलाच ट्रेंड होत आहे.

जाहिरातीच्या क्षेत्रात बॉलिवूड स्टार्सची चांगलीच चलती आहे. महिलांशी निगडित असलेल्या उत्पादनांची जाहिरात करताना बॉलिवूड अभिनेत्रींचा वापर केला जातो. मात्र, मागील काही वर्षांत पुरुष देखील याचा प्रचार करू लागले आहेत. सलमान खानने एका डिटर्जंट पावडरची जाहिरात केल्यावर आता हृतिकही त्याच्याच वाटेवर निघाला आहे. ​हेमा, रेखा, जया और सुषमा असे स्लोगन असणाºया एका डिटर्जंट पावडरची जाहिरात हृतिक रोशनने केली आहे. या जाहिरातीचा फोटो ट्विटरवर चांगलाच ट्रेंड होत आहे. हृतिक रोशनने ही जाहिरात का केली यापासून ते थेट आता हृतिक वॉशिंग पावडरच्या स्लोगनवर नाचताना दिसेल असे कमेंट त्याच्यावर केले आहे.}}}} ">http:// एका ट्विटर यूजरने जाहिरातीवर  कंमेंट करताना लिहिले की, आता, हेमा, रेखा, जया व सुषमाचे काय होईल. दुसºया एकाने यावर कं मेंट केले ‘हृतिकने आतापर्यंत जया व रेखा सोबत चित्रपटात काम केले आहे. हेमा व सुषमा सोबत त्याने काम केले नाही, अखेर त्याने या सर्वांसोबत काम केलेच. }}}} ">http://बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असलेला हृतिकची ब्रँड व्हॅल्यू मोठी आहे. मात्र तो बोटावर मोजता येणाºया कंपन्यांचे एन्डोर्समेंट करताना दिसतो. हृतिकचा चेहरा महागड्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी वापला जात असतानाच त्याने गृहोपयोगी वस्तूची जाहिरात करून आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे हृतिकने प्रथमच एखाद्या अशा वस्तूची जाहिरात केली आहे. }}}} ">http://यापूर्वी शाहरुख खानने एका साबणाची जाहिरात केली होती. महिलांच्या साबणाचा प्रचार करणार तो पहिला पुरुष अभिनेता ठरला होता. यानंतर सलमान खानने एका ‘वॉशिंग पावडर’ची जाहिरात केली होती.