ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार हेमा मालिनी यांच्या चाहत्यांची संख्या भारतात नाहीतर, सातासमुद्रा पार देखील आहे. ड्रिम गर्लची एक झलक पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते गर्दी करतात. आता देखील असंच काही झालं आहे. त्यांच्या एका व्हिडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहतीला वाईट वागणूनक दिल्यानं त्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत.
हेमा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यानंतर त्या टीकेच्या धनी ठरल्यात. उत्तर प्रदेशातील एका नवरात्रीच्या कार्यक्रमात हेमा मालिनी यांनी हजेरी लावली होती. प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित असलेल्या हेमा मालिनींना पाहून एक चाहती कॅमेरा घेऊन सेल्फीसाठी त्यांच्या जवळ गेली. पण, हेमा यांनी तिच्याकडे कटाक्ष टाकला. तसेच कॅमेऱ्याकडे पाहून एक हसल्याही नाही.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलंय. एका युजरनं कमेंट केली, "जर हेमा मालिनींना चाहत्यांसोबत फोटो काढताना इतका त्रास होत असेल, तर त्या सार्वजनिक आमंत्रणे का स्वीकारतात?" तर दुसऱ्याने थेट त्यांची तुलना अभिनेत्री जया बच्चनशी करत म्हटले, "या जया बच्चनची कॉपी आहेत", अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे
Web Summary : Hema Malini faced backlash after a video showed her seemingly cold reaction to a fan requesting a selfie at a Navratri event. Netizens criticized her demeanor, drawing comparisons to Jaya Bachchan and questioning her public appearances if fan interactions are bothersome.
Web Summary : हेमा मालिनी को एक वीडियो के बाद आलोचना का सामना करना पड़ा जिसमें नवरात्रि कार्यक्रम में एक प्रशंसक के सेल्फी मांगने पर उनकी प्रतिक्रिया ठंडी दिखी। नेटिज़न्स ने उनके व्यवहार की आलोचना की, जया बच्चन से तुलना की और उनकी सार्वजनिक उपस्थिति पर सवाल उठाया।