‘तो’ नाही तर ‘हा’ आहे करिना व सैफच्या लाडक्या तैमूरचा खरा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 15:11 IST
Kareena and Saif’s intimate moment with baby Taimur Ali Khan : Taimur Ali Khan ral picture : करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे. यात करिना, सैफ आणि तैमूर असे तिघेही दिसत आहे.
‘तो’ नाही तर ‘हा’ आहे करिना व सैफच्या लाडक्या तैमूरचा खरा फोटो!
करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याने या जगात पाऊल ठेवल्यापासून केवळ त्याचीच चर्चा आहे. आधी नावावरून मग फोटोवरून तो सतत चर्चेत आहे. कालच करिना व सैफच्या लाडक्या तैमूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत लहानगा तैमूर मॉम करिनाच्या कुशीत मस्तपैकी पहुडलेला दिसतो आहे. हा फोटो आला आणि क्षणात व्हायरल झाला. पण पाठोपाठ हा तो फेक असल्याचीही बातमी येऊन धडकली. कालच करिना व सैफच्या लाडक्या तैमूरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण पाठोपाठ हा फोटो फेक असल्याचीही बातमी येऊन धडकली. आता तैमूरचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे. यात करिना, सैफ आणि तैमूर असे तिघेही दिसत आहे. दवाखान्यातील हा फोटो कुणीतरी लीक केला. अर्थात अद्यापही या फोटोची अधिकृत सत्यता पटलेली नाही. पण प्रथमदर्शनी हा फोटो फेक वाटत नाही. हाच खरा फोटो असल्याचा दावा काही संकेतस्थळांनी केला आहे. तैमूरच्या जन्माचा सैफ व करिनाच्या चेहºयावर पसरलेला आनंद या फोटोत अगदी स्पष्टपणे दिसतोय. हा फोटो पाहिल्यानंतर करिनाच्या कुशीत पहुडलेला तैमूर कुणासारखा दिसतो, याबद्दलची तुमची चर्चा सुरु झाली असणार,हे निश्चित.सध्या कपूर आणि खान दोन्ही कुटुंबात तैमूरच्या जन्माचा आनंद साजरा केला जात आहे. स्वत: सैफने तैमूरच्या जन्माची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. आमच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. २० डिसेंबर २०१६ ला तैमुर अली खान पतौडीचा जन्म झाला. गेल्या नऊ महिन्यांपासून प्रसारमाध्यमांनी आम्हाला समजून घेतले आणि त्यांनी जो काही पाठिंबा दिला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. तसेच, आमचे चाहते आणि शुभेच्छुक यांनी आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचे आभार मानतो. सर्वांना नाताळच्या आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा, असे वक्तव्य त्याने जारी केले होते.