Join us  

विकी कौशलने शेअर केलेल्या आपल्या खास शेजाऱ्यांसोबतचा फोटो पाहिलात का?, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 6:28 PM

विकी कौशलने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होतो आहे.

'उरी' सिनेमाच्या यशानंतर विकी कौशल हे नाव घराघरात पोहोचले आहे. विकीने 'लव शव ते चिकन खुराना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते मात्र त्याला ओळख मिळाली ती 'मसान' सिनेमातून. मसान हा त्याच्यासाठी टर्निंग पाईंट ठरला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. विकी सोशल मीडियावर सक्रियअसून तो या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असतो. नुकताच विकीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत विकीने त्याच्या शेजाऱ्यांची ओळख करून दिली आहे. विकीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

विकी कौशलने त्याचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विकीसोबत या फोटोमध्ये एक पाळीव कुत्री दिसत आहे. या कुत्रीच नाव बेला आहे. बेला ही विकीच्या शेजाऱ्यांची पाळीव कुत्री आहे. विकीने हा फोटो शेअर करत “शेजारी… #बेला” असे कॅप्शन दिले आहे. विकी आणि बेलामधील प्रेम पाहून त्याचे चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर उरीचा दिग्दर्शक आदित्य धरसोबत विकी पुन्हा एकदा काम करणार आहे. 'अश्वत्थामा'वर सिनेमा तयार करत आहेत. यात विकी गुरू द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामाचीच भूमिका साकारणार आहे. . तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. तसेच सिनेमात रॉयल लूक येण्यासाठी तो तलवारबाजी आणि तिरंदाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेणार आहे.

याशिवाय शूजित सरकार दिग्दर्शित सरदार उधम सिंग या चित्रपटात विकी मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात विश्व सुंदरी मनुषी छिल्लर देखील विकीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :विकी कौशलमानुषी छिल्लर