Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकी श्रॉफच्या 'हिरो'सिनेमातील पहिल्याच सीनमधील ही चूक तुम्ही पाहिलीय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 11:51 IST

बॉलिवूडच्या सिनेमात प्रत्येक गोष्टीची दिग्दर्शकाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. प्रत्येक शॉट परफेक्ट झाला पाहिजे यासाठी टेक रिटेक घेतले जातात. ...

बॉलिवूडच्या सिनेमात प्रत्येक गोष्टीची दिग्दर्शकाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. प्रत्येक शॉट परफेक्ट झाला पाहिजे यासाठी टेक रिटेक घेतले जातात. जेव्हा दिग्दर्शकाला वाटतं की हा सीन परफेक्टरित्या शूट झाला आहे त्याचवेळी त्याला हिरवा कंदील दाखवला जातो. मात्र ब-याचदा अशा काही गोष्टी घडतात की दिग्दर्शकाच्या नजरेतून चुकतात. नजरचूक म्हणा किंवा कामाचा तणाव म्हणा सिनेमात बारीकसारीक गोष्ट राहतेच. मात्र काही चाणाक्ष फॅन्सच्या नजरेपासून ही गोष्ट लपून राहू शकत नाही. अशीच एक चूक घडली होती ती बॉलिवूडचे हिरो अर्थात जॅकी श्रॉफ यांच्या पदार्पणाच्या सिनेमाबाबत.'हिरो' या सिनेमातून जॅकी श्रॉफ यांनी रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. या सिनेमात जॅकी श्रॉफ यांच्यासोबत मीनाक्षी शेषाद्री, संजीव कुमार, शम्मी कपूर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.1983 साली हा रुपेरी पडद्यावर झळकलेल्या या सिनेमातून बॉलिवूडला ‘हिरो’ गवसला होता. मात्र या सिनेमाच्या जॅकी श्रॉफ यांच्या पहिल्या एंट्रीच्या सीनमध्येच गडबड झाली होती.एका फाईटिंगच्या सीनने जॅकी श्रॉफ रुपेरी पडद्यावर एंट्री करतात. हा सीन तुम्ही लक्षपूर्वक पाहिल्यास यांत तुमच्या लक्षात येईल की या सीनसाठी जॅकी श्रॉफ यांच्या बॉडी डबलचा अर्थात डुप्लिकेटचा वापर करण्यात आला होता. फाईटिंग पाहताना तुम्हाला सहज कळेल की यांत जॅकी श्रॉफ नसून त्यांचा डुप्लिकेट आहे. फायटिंग करताना अनेकदा जॅकी श्रॉफ खाली पडतात. त्यावेळी डुप्लिकेटचा चेहरा स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा जेव्हा तो उभा राहतो तेव्हा मात्र जॅकी श्रॉफ दिसतात. ही छोटीशीच चूक असली तरी ती दिग्दर्शक सुभाष घई यांच्याकडून कशी घडली हे अजूनही न उलगडलेले कोडं आहे. बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांनी त्यांच्या सुहाना सफर विद अन्नू कपूर शोमध्ये हा किस्सा ऐकवला होता.