सीनियर कलाकारांबाबत हसीना श्रद्धा कपूरने केले 'हे' वक्तव्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 11:51 IST
बॉलिवूडमध्ये सीनिअर अभिनेत्यांसोबत नव्या अभिनेत्रींच्या जोड्या बनताना आपण बघतोय. या जोड्या प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरत आहेत. डीएनएला दिलेल्या इंटरव्ह्यु ...
सीनियर कलाकारांबाबत हसीना श्रद्धा कपूरने केले 'हे' वक्तव्य !
बॉलिवूडमध्ये सीनिअर अभिनेत्यांसोबत नव्या अभिनेत्रींच्या जोड्या बनताना आपण बघतोय. या जोड्या प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरत आहेत. डीएनएला दिलेल्या इंटरव्ह्यु दरम्यान सीनिअर कलाकारांसोत काम करण्याबाबत अभिनेत्री श्रद्धा कपूरने एक वक्तव्य केले आहे. सीनिअर कलाकारांसोबत काम करण्याबाबत श्रद्धा कपूर खूप सकारात्मक दिसली. सीनिअर कलाकार हे सुपरस्टार्स आहे. माझ्याकडे जर एखाद्या चांगल्या चित्रपटाची स्क्रिप्ट आली ज्यात सीनिअर कलाकार असतील तो चित्रपटल मी नक्कीच साईन करेन असे ती म्हणाली. माझ्याबाबत नेहमी सांगण्यात येते की मला सीनिअर कलाकारांबरोबर काम नाही करायचे. तर या गोष्टीत काहीच तथ्य नाही. मला सीनिअर कलाकरांसोबत काम करायला नक्कीच आवडले. ALSO READ : शक्ती कपूरच्या कडेवरील ही चिमुकली आहे तरी कोण?जी आज आहे बॉलिवूडची हसीनाश्रद्धा कपूरचा हसीना पारकर आज बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अपूर्व लाखियाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात ती दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरची भूमिका साकारते आहे. हसीनाला लोक आपा या नावाने ओळखण्याचे. दाऊद देश सोडून पळून गेल्यावर तिनेच त्याचा बेकायदेशीर कारभार सांभाळला होता. हसीनाची भूमिका साकारण्यासाठी श्रद्धाने चार कोटींचे मानधन घेतले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाच्या रिलीजला मुहुर्त सापडत नव्हता. हसीनाची भूमिका पडद्यावर साकारणे श्रद्धासाठी आव्हानात्मक होते. यात श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर दाऊच्या भूमिकेत झळकला आहे. हसीना पारकर रिलीज होण्याआधी श्रद्धाने प्रभासच्या साहो चित्रपटाची शूटिंग सुरु केली आहे. हैदराबादमध्ये श्रद्धाचे प्रभासने जंगी स्वागत केले होते. तिला सेटवर पहिल्याच दिवशी प्रभास 17 ते 18 हैदराबादी पदार्थ खाऊ घातले होते. यात श्रद्धाचा डबल रोल असल्याची चर्चा आहे. साहो बिग बजेट चित्रपट असून त्याचा बजेट 150 कोटी रुपये इतके आहे. श्रद्धाने यात काम करण्यासाठी 12 कोटींचे मानधन मागितले होते मात्र मेकर्सने तिला 9 कोटी रुपयांवर तडजोड करायला लावली. तसेच भारताची फुलराणी सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये सुद्धा श्रद्धा झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी सायनाकडून श्रद्धा बॅडमिंटनचे धडे घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.