Join us

स्पोर्ट्स बायोपिकमध्ये हर्षवर्धन कपूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 17:59 IST

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’ चित्रपटातून अभिनेता हर्षवर्धन कपूर याने डेब्यू केला. आता मात्र तो वेगळ्याच एका प्रोजेक्टमध्ये ...

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’ चित्रपटातून अभिनेता हर्षवर्धन कपूर याने डेब्यू केला. आता मात्र तो वेगळ्याच एका प्रोजेक्टमध्ये बिझी झालाय म्हणे. सध्या तो विक्रमादित्य मोटवानीच्या ‘भावेश जोशी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.यासोबतच व्यावसायिक शूटर आणि आॅलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्रा यांच्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करण्यासंदर्भात त्याच्यासोबत बोलणी सुरू आहेत. त्याचा डेब्यू चित्रपट ‘मिर्झिया’ बॉक्स आॅफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नसला तरीही यापुढील चित्रपटांकडे तो मोठ्या आशेने पाहतोय. वडील अनिल कपूर आणि बहीण सोनम कपूर या बॉलिवूडमधील दोन महत्त्वाच्या व्यक्तीरेखा. बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावण्यासाठी हर्षवर्धनने या दोघांच्या नावांचा कधीही वापर केला नाही. ‘मिर्झिया’ जरी त्याचा फ्लॉप झाला असला तरी त्याचे आगामी चित्रपट नक्कीच यशस्वी होतील, अशी त्याला आशा आहे.