Join us

हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड पोहोचली साऊथ आफ्रिकेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 13:21 IST

सध्या टीम इंडिया साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी काही क्रिकेटर्सचे कुटुंबीयसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. शिखर धवनची पत्नी आणि मुलेसुद्धा जोहान्सबर्गमध्ये ...

सध्या टीम इंडिया साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी काही क्रिकेटर्सचे कुटुंबीयसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. शिखर धवनची पत्नी आणि मुलेसुद्धा जोहान्सबर्गमध्ये आहेत. नुकताच शिखरची पत्नी आयशाने मुलगी रियाचा बर्थ डे सेलिब्रेट केला.  या बर्थ डे पार्टीत क्रिकेटर नाहीत मात्र त्यांच्या पत्नी सहभागी झाल्या होत्या. यात रोहित शर्माची पत्नी ऋतिका सजदेह, भुवनेश्वर कुमारची पत्नी नूपुर नागर, उमेश यादवची पत्नी तान्या वाधवा आणि रविचंद्रन अश्निन पत्नी प्रीती नारायण सुद्धा होती. मात्र या पार्टीत आणखीन एक मुलगी सहभागी झाली होती. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून एली अवराम आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा एली आणि हार्दिक पांड्याच्या अफेअरच्या चर्चा व्हायला लागल्या आहेत. हा फोटो शिखर धवनची पत्नी आयशाने सोशल मीडियावर शेअर केला. आयशाने आपल्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी दिली होती. या पार्टीत क्रिकेटर्सच्या पत्नींसोबत एली अवराम सुद्धा दिसते आहे.