हरभजन सिंग लवकरच करणार सिगिंगमध्ये डेब्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 13:30 IST
टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग आपली एक नवी इनिंग सुरु करण्यास सज्ज झाला आहे. मैदानानंतर तो आता तुम्हाला ...
हरभजन सिंग लवकरच करणार सिगिंगमध्ये डेब्यू
टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग आपली एक नवी इनिंग सुरु करण्यास सज्ज झाला आहे. मैदानानंतर तो आता तुम्हाला रेकॉर्डिंग स्टुडिओत दिसणार आहे.असे गडबडून जाऊ नका हरभजन तुम्हाला गाताना दिसणार आहे. यामुळे सध्या हरभजन खास तयारी करताना दिसतो आहे. हरभजनने सध्या गाणं शिकायला सुरुवात केली आहे. शास्त्रीय संगीताचे धडे तो गिरवतो आहे. स्टुडिओत जाऊनसुद्धा तू रियाज करतो आहे. हरभजन मैदानाबरोबरच टीव्हीवर अनेक रिऑलिटी शोमध्ये दिसला होता. डान्स स्पर्धेत ही तो सहभागी झाला होता. यानंतर हरभजन आता सिगिंग क्षेत्रात डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. यासर्वांच्या पार्श्वभूमीवर हरभजनला ऑलराउंडर म्हटले तर ते वावगे ठरु नये. डिसेंबर महिन्यात त्याचे गाणं रसिकांच्या भेटीला येणार आहे. हे त्याचे सोलो सॉन्ग असणार आहे. या गाण्याला मिथुनने म्युझिक दिले आहे. या गाण्याच्या माध्यमातून देशातल्या खऱ्या हिरोंना सलाम करण्यात येणार असल्याचे समजते आहे. हे गाणं अर्ध हिंदी अर्ध इंग्लिश आहे. हे गाण देशातल्या वेगवेगळ्या भागांवर चित्रित केले आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलखतीत मिथुन म्हणाला, ''हरभजन माझा खूप चांगला मित्र आहे. मला नेहमीच त्याच्यासोबत काम करायचे होते. म्युझिक हा आमच्या दोघांमधला कॉमन इंटरेस्ट होता. आम्ही एक चांगल्या कॉन्सेप्टची वाट बघत होतो. शेवटी हे सगळं जुळून आले.'' हरभजन लवकरच अभिनय करताना पण दिसणार असल्याचे समजते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हरभजन एका पंजाबी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.हरभजनने अभिनेत्री गुता बसराशी विवाह केला आहे.