Join us
Daily Top 2Weekly Top 5

First Picture: फ्रीडा पिंटोने ​दिला बाळाला जन्म, गोंडस PHOTO शेअर करत सांगितलं 'नाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 15:27 IST

फ्रीडा पिंटोने सोशल मीडियावर एक गोड फोटो शेअर करून चाहत्यांसह तिचा आनंद शेअर केला आहे.

'स्लमडॉग मिलेनियर' फेम अभिनेत्री फ्रीडा पिंटो आणि तिचा पती कॉरी ट्रॅन  यांच्या जीवनात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दोघांच्या जीवनात एक बाळ आलं आहे. दोघेही आई-बाबा झाले आहेत. फ्रीडा पिंटोने मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी आल्यानंतर चाहते आणि सेलेब्स सोशल मीडियावर दोघांचे अभिनंदन करत आहेत. 

फ्रीडा पिंटोने सोशल मीडियावर एक गोड  फोटो शेअर करून चाहत्यांसह तिचा आनंद शेअर केला आहे. बाळाचे नाव रूमी-रे असे ठेवले आहे. यादरम्यान फ्रीडाने तिच्या बाळाची पहिली झलकही दाखवली आहे. शेअर केलेल्या फोटोत बाळाचा चेहरा तिने दाखवला नाहीय. आपल्या बाळासह किती आनंदी दिसत आहे हे शेअर केलेल्या फोटोत तुम्हाला पाहायला मिळेल. 

पहिल्या फोटोमध्ये फ्रीडा मुलासोबत दिसत आहे.तर दुसरा फोटोमध्ये कोरी ट्रॅन मुलासोबत निवांत वेळ घालवत आहे. फ्रीडा पिंटोने फोटो शेअर करत सपर्क अशी कॅप्शनही दिली आहे. 'हॅपी बर्थडे डॅड कोरी. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रेग्नंसीकाळही तिने खूप एन्जॉय केला. बेबी शॉवर सेलिब्रेशनचे फोटोही तिने शेअर केले होते.चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला होता. शेअर केलेल्या फोटोंमध्ये फ्रीडाने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनचं खुलून गेलं होतं. जून महिन्यात फ्रीडाने तिचा पती कोरी ट्रेन सोबत एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना बाळाच्या येण्याची गोड बातमी दिली होती. 

फ्रिडा स्लमडॉग मिलियनेयर पासून आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे. ती 'राइज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स', 'मायकल विंटरबॉटम', 'तृष्णा', 'डे ऑफ द फाल्कन', 'अमर' इत्यादी चित्रपटांमध्ये दिसली आहे.

​​