Join us

प्रिती झिंटाने ‘हा’ फोटो शेअर करीत दिल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 21:24 IST

अभिनेत्री प्रिती झिंटाने एक फोटो शेअर करीत, नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रितीचा हा फोटो तिच्या चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हल्ली सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव असल्याचे दिसून येत आहे. ती नियमितपणे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करीत असते. आता पुन्हा एकदा प्रितीने असाच काहीसा एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये ती डोंगराळ भागात वास्तव्य करणाºया लोकांच्या लूकमध्ये बघावयास मिळत आहे. मात्र तिचा हा फोटो यूजर्सला फारसा आवडला नसल्याचे दिसून येत आहे. कारण बºयाच यूजर्सनी तिच्या या फोटावरून तिला नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वास्तविक हल्ली सोशल मीडियावर सेलिब्रिटींची धूम बघावयास मिळते. बहुतेक सेलिब्रिटी इव्हेंट असो वा पार्टी यातील एखादा फोटो त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर करीत असतात. यामध्ये प्रितीही तिचे फोटो शेअर करीत असते. यावेळेस तिने नवरात्रोत्सवाच्या अगोदरच म्हणजेच १८ मार्च रोजी लोकांना शुभेच्छा देताना एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये ती पहाडी लूकमध्ये बघावयास मिळत आहे. प्रितीने हा फोटो हिमाचल प्रदेशातील शिमला येथील हठोटी मंदिर येथे क्लिक केला आहे. फोटोत तिने कपाळावर स्कार्फ बांधला आहे. हा फोटो शेअर करताना तिने नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. आपल्या लूकला तिने ‘पहाडी स्वॅग’ असे नाव दिले आहे.  दरम्यान, उद्योगपती नेस वाडियासोबत झालेल्या वादावादीनंतर प्रिती बॉलिवूडमधून गायब झाली. तिने जेने गुडइनफ याच्याशी २०१६ मध्ये लग्न केले. तेव्हापासून ती बॉलिवूडमधून गायब झाली आहे. मात्र आपल्या ट्रॅव्हल डायरीजमधील फोटो शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे.