उर्मिलाने लिहिले की, ‘काही असे क्षण असतात जे तुमच्या आयुष्यात खूपच महत्त्वपूर्ण असतात. तुम्हा सर्वांसोबत असाच एक अविस्मरणीय क्षण मी शेअर करीत आहे. तुम्हा सर्वांच्या पाठबळासाठी मी ऋणी आहे. नेहमीच असेच पाळबळ आणि सहकार्य असू द्या’ काही दिवसांपूर्वीच उर्मिलाने तिच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर केले होते. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. या फोटोमध्ये उर्मिला केक कापताना आणि मेणबत्ती विझविताना बघावयास मिळत होती. या सर्वच फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती.
तुमच्या माहितीसाठी, उर्मिलाने मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत २०१६ मध्ये लग्न केले होते. मोहसीन काश्मिरी बिजनेसमॅन असून, एक मॉडल आहे. उर्मिलाने अतिशय सीक्रेट पद्धतीने मोहसीनसोबत लग्न केले होते. मोहसीन उर्मिलापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. उर्मिलाने तिच्या लग्नाचा अचानकच उलगडा केला होता. त्यामुळे तिच्या चाहत्यांना जबरदस्त हादरा बसला होता. मोहसीन उर्मिलापेक्षा दहा वर्षांनी लहान असल्याने हे लग्न चांगलेच चर्चेत आले होते.