Join us  

असा घडला जंगलीच्या शूटिंग दरम्यान अपघात, विद्युत जामवाल झाला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 9:14 AM

विद्युत जमवाल त्याच्या जंगली चित्रपटाला घेऊन फारच चर्चेत राहिला आहे.  हा चित्रपट हॉलिवूडचे दिग्दर्शक चक रसेल बनवत आहे. या ...

विद्युत जमवाल त्याच्या जंगली चित्रपटाला घेऊन फारच चर्चेत राहिला आहे.  हा चित्रपट हॉलिवूडचे दिग्दर्शक चक रसेल बनवत आहे. या चित्रपटासाठी विद्युतने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. आपल्याला हे माहितच आहे की विद्युत आपले ऍक्शन सीन्स स्वतः करतो आणि तो बॉलिवूडमध्ये ऍक्शन हिरो म्हणून तो ओळखला जातो. इतर ऍक्शन हिरोप्रमाणे विद्युत देखील ऍक्शन सीन शूट करताना जखमी होत असतो, नुकताच जंगली चित्रपटाचा एक ऍक्शन सीन करताना तो जखमी झाला. त्याच्या डोक्याला एक लोखंडी साच्या ला आपटले, त्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला पण जखमी झाल्यानंतर थोडा आराम करून  त्याने त्याच दिवशी लगेच शुटिंग ला सुरवात केली ह्यावर विद्युत म्हणतो की "जेव्हा तुम्ही रिअल  ऍक्शन सीन करतात तेव्हा तुम्हाला इजा होण्याची शक्यता जास्त असते." विदुयतवर प्रचंड खुश असलेला दिग्दर्शक रसल म्हणतो , "मी अरनॉल्ड, द्वेन जॉन्सन ह्यासारख्या ऍक्शन हिरोबरोबर काम केले आहे पण विदुयतच्या फिटनेस आणि त्याची ऍक्शन बघून मी खूपच प्रभावित आहे आणि विदुयत पूर्णपणे बरा आहे.''  ‘द मास्क’,‘अ नाईटमेर आॅन एल्स ट्रिट’,‘द स्कॉर्पियन किंग’ आणि ‘आय एम व्रथ’ सारख्या सिनेमात रसेल यांनी योगदान दिले आहे.ह्या चित्रपटाचे निर्माते जंगली पिक्चर्स आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. ह्या चित्रपटात एक मनुष्य आणि एक हत्तीचे यांचे सुंदर नाते दाखवण्यात आले आहे. ज्यात विद्युत एक जनावरांच्या डॉक्टरची भूमिका करत असून त्याची भिडत इंटरनॅशनल शिकाऱ्यांशी होते. यात विद्युतसह तापसी पन्नू आणि साकिब सलम कुरेशी यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. विद्युतचा हा चित्रपट १९ आक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटातील एका संवादामुळे चित्रपट वादाच्या भोवºयात सापडला आहे. या संवादामुळे ललिता पवार यांचा उल्लेख ‘कानी’ असा केला आहे. ज्यामुळे इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी त्यास विरोध केला आहे.