Join us  

Hansika Motwani Wedding: शाही लग्नासाठी कुटुंबासोबत जयपूरला पोहोचली हंसिका, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर दिसला ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 3:29 PM

Hansika Motwani: हंसिका मोटवानी तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधणार आहे. तिचा होणारा नवरा मोठा उद्योगपती आहे.

Hansika Motwani At Mumbai Airport: हंसिका मोटवानी  (Hansika Motwani) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. हंसिका तिचा बॉयफ्रेंड आणि बिझनेस पार्टनर सोहेल कथुरिया (Sohael Khaturiya)सोबत 4 डिसेंबरला जयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. लग्नासाठी जयपूरला निघालेली हंसिका आईसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हंसिकाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हंसिका तिच्या आईसोबत मुंबई विमानतळावर दिसत आहे. यावेळी अभिनेत्री कलरफुल आउटफिटमध्ये दिसली. सर्वांनी पापाराझींसाठी पोझ दिली. हंसिकाच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो स्पष्ट दिसत होतो.

हंसिका मोटवानी आणि सोहेलचा शाही विवाह सोहळा जयपूरच्या मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये होणार आहे. या हे डेस्टिनेशन वेडिंगमध्ये फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी होतील. रिपोर्टनुसार, 4 डिसेंबरच्या संध्याकाळी फेरे होतील, तर त्याच दिवशी सकाळी हळद समारंभ होईल. 2 डिसेंबरला सुफी रात्री, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेहंदी, संगीत होईल. पार्टीनंतर थीम असलेली कॅसिनो चौथ्या दिवशी संध्याकाळी होईल. 

शाका लाका बूम बूम’ या मालिकेतून हंसिका बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर ती चित्रपटांकडे वळली.  क्योंकी सास भी कभी बहू थी, सोनपरी, करिश्मा का करिश्मा अशा अनेक टीव्ही मालिकेत हंसिका झळकली. अनेक मालिकांमध्य काम केल्यानंतर हंसिकाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. त्यावेळी तिचं वय होतं 15 वर्षे. 2007 साली हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’ या सिनेमात हंसिका झळकली आणि तिला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. कारण काय तर त्यावेळी हंसिकाचं वय होतं केवळ 16 वर्षे आणि चित्रपटात ती वयापेक्षा कितीतरी मोठी दिसली होती. त्याआधी 2003 मध्ये ‘कोई मिल गया’ या सिनेमात ती बालकलाकार म्हणून दिसली होती आणि चारच वर्षांनी ‘आपका सुरूर’मध्ये ती लीड हिरोईन होती. ‘कोई मिल गया’मधली बालकलाकार अचानक इतकी मोठी झालेली पाहून सर्वच हैराण झाले होते.  यावरून  वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. लवकर मोठं होण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचं याकाळात बोललं गेलं होतं.  

टॅग्स :हंसिका मोटवानीसेलिब्रिटी