बºयाचशा सेलिब्रिटींनी याविषयी शोक व्यक्त करताना आपल्या भावना मांडल्या. परंतु अभिनेत्री तथा खासदार हेमामालिनी यांनी या संपूर्ण प्रकरणी एक वेगळाच सूर आवळल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हेमामालिनी यांनी आगीचे कारण मुंबईची वाढती लोकसंख्या असल्याचे म्हटले आहे. हेमामालिनी यांनी म्हटले की, ‘पोलीस आपले काम चांगल्या पद्धतीने करीत नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र मुंबईमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळेच अशाप्रकारच्या घटनांना चालना मिळत आहे. मुंबईमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे जागा अपुरी पडत आहे. शहरात लोकसंख्या पुरेशी असताना बाहेरून येणाºयांना शहरात बंदी आणायला हवी. त्यांनी दुसºया शहरात स्थायिक व्हायला हवे.’
हेमामालिनी यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला वळण मिळाले असून, ते कुठले स्वरूप घेणार हे सांगणे मुश्किलच म्हणावे लागेल. पण काहीही असो, गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये अशाप्रकारच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, या अग्नितांडवानंतर मुंबई पोलिसांनी अबव रेस्टॉरंटविरोधात ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.