#HalfGirlfriend is going to release on 19th May 2017
‘हाफ गर्लफ्रेंड’ ला मिळाली अखेर तारीख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 11:04 IST
श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर हे सध्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. अद्याप चित्रपटातील कोणते पोस्टर रिलीज न ...
‘हाफ गर्लफ्रेंड’ ला मिळाली अखेर तारीख!
श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर हे सध्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. अद्याप चित्रपटातील कोणते पोस्टर रिलीज न झाल्याने सर्वांना वाटतेय की, आता चित्रपटाचा ट्रेलर केव्हा येणार? आणि हाफ गर्लफ्रेंड केव्हा रिलीज होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.नुकतीच चित्रपटाची रिलीज डेट श्रद्धाने टिवटरवर घोषित केली आहे. चित्रपट १९ मे २०१७ ला रिलीज होणार आहे. चेतन भगत याच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ पुस्तकावर आधारित हा चित्रपट असून यात अर्जुन-श्रद्धाची जोडी प्रथमच एकत्र या चित्रपटात दिसणार आहे.माधव आणि रिया यांची कहानी त्यांनी सांगितली असून ते दोघे त्यांच्या बास्केटबॉलच्या प्रेमामुळे एकत्र येतात.