Join us

बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक एकेकाळी विकायचा डिटर्जंट पावडर, आज आहे कोटींच्या संपत्तीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 20:00 IST

संघर्षाचा काळ इतका वाईट होता की त्यांना कधी कधी दोन वेळचे जेवणही मिळायचे नाही. बेरच दिवस उपाशी राहूनच दिवस काढावे लागायचे.

मायानगरी मुंबईनं कुणालाही निराश केलं नाही. अभिनेता बॅड मॅन गुलशन ग्रोवर यांनीही मोठ्या मेहनतीने अभिनेता म्हणून चंदेरी दुनियेत स्वतःला सिद्ध करावं लागलं होते. त्यांनाही स्ट्रगल काही चुकला नाही. अभिनयात येण्यापूर्वी दोन पैसे कमावण्यासाठी गुलशन ग्रोवर यांनीही मिळेल ते काम केले.  

 

संघर्षाचा काळ इतका वाईट होता की त्यांना कधी कधी दोन वेळचे जेवणही मिळायचे नाही. बेरच दिवस उपाशी राहूनच दिवस काढावे लागायचे.स्ट्रगल काळ कुणालाच चुकला नाही. स्ट्रगल पिरीयडच्या आठवणी  गुलशन ग्रोवर यांच्या  मनात आजही ताज्याच आहेत.गुलशन ग्रोव्हर यांच्या आयुष्यावर 'बॅडमॅन' पुस्तकात त्यांचा जीवनप्रावस उलगडण्यात आला आहे. 

अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सुरुवातीच्या दिवस गेले. गरिबीला ते कधीच घाबरले नाही. दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टींचा खुलासा केला होता. लहानपणापासून त्यांनी चढउतार पाहिले आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी शाळेत शिकत असतानाच काम करायला सुरुवात केली होती. कधी डिटर्जंट पावडर, तर कधी फिनाइल विकून दोन पैसे ते कमावयचे. शाळेचा खर्च त्यांनी कमावलेल्या पैस्यातून निघायचा. वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते.

मुंबईत जेव्हा अभिनय करण्यासाठी ते मायानगरीत आले त्यानंतर त्यांच्या आयुष्याला जणू कलाटणी मिळाली.संघर्ष तेव्हाही त्यांना करावाच लागला. सुरुवातीला काम मिळण्यासाठी करावी लागलेली मेहनतही प्रचंड करावी लागली. 'रॉकी' हा त्यांचा पहिला सिनेमा.

 

अभिनयाची आवड तर होतीच  अमरीश पुरी, अमजद खान या सगळ्यांकचा अभिनया पाहून खूप काही शिकल्याचेही त्यांनी सांगितले. अदाकारीच्या दुनियेत खलनायकाची भूमिका साकारता साकारता आज क्राईम मास्टर गोगो, बॅड मॅन म्हणून गुलशन ग्रोवर प्रसिद्ध आहेत.बॉलिवूड नाहीतर हॉलिवूडमध्येही त्यांनी आपली छाप पाडली आहे.

 

1997 मध्ये  'द सेकंड जंगल बुक : मोगली अँड बल्लू' हा त्यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा.जर्मन, ऑस्ट्रेलियन, पोलिश, कॅनेडियन, मलेशियन, ब्रिटीश आणि नेपाळी सिनेमांसह विविध भारतीय भाषांतल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. गुलशन ग्रोवर आज १२० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. 

टॅग्स :गुलशन ग्रोव्हर