Join us  

दीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 10:33 PM

बेंगळुरुच्या लीला पॅलेसमध्ये हा रिसेप्शन सोहळा आयोजित केला. बेंगळुरुच्या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॅडमिंटन जगतातील अनेक मन्यावरांनी उपस्थितीत लावली.

ठळक मुद्दे बंगळुरुच्या लीला पॅलेसमध्ये हा रिसेप्शन सोहळा आयोजित केलादीपिका आज गोल्डन रंगाची सारी नेसली आहे तर रणवीरने तिला मॅच करत शेरवानी घातली आहे

इटलीत लेक कोमोमध्ये शाही विवाह पार पडल्यानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी आज भारतातले पहिले रिसेप्शन बेंगळुरु इथं दिले. आम्ही तुम्हाला आधीच सांगितल्या प्रमाणे बंगळुरुच्या लीला पॅलेसमध्ये हा रिसेप्शन सोहळा आयोजित केला. बेंगळुरुच्या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॅडमिंटन जगतातील अनेक मन्यावरांनी उपस्थितीत लावली. हे रिसेप्शन दीपिकाच्या आई-वडिलांनाकडून आयोजित करण्यात आलेले आहे. 

 

भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे आपल्या पत्नीसोबत याठिकाणी आलेले दिसले. पी. गोपिंचद आणि पी.व्ही सिंधूनेही दीपिकाच्या रिसेप्शनला हजेरी लावली आहे. 

 

 

 

दीपिकाने इटलीमध्ये झालेल्या दोन्ही प्रकारच्या विवाह सोहळ्यात सब्यासाचीने डिझायन केलेले ड्रेसस परिधान केले होते आजही दोघांनी सब्यासाचीच पसंती दिली आहे. दीपिका आज गोल्डन रंगाची सारी नेसली आहे तर रणवीरने तिला मॅच करत शेरवानी घातली आहे. या स्वागत समारंभाच्या आयोजनात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

 

गत १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत रणवीर-दीपिका विवाहबद्ध झालेत. दोघांनीही कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे.

 

२८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल. 

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग