Join us

महानायकाला ‘चांदनी’ निखळणार याची कुणकुण लागली होती?, बिग बींच्या एका पोस्टने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 10:27 IST

हिंदी चित्रपटसृष्टीची ‘चांदनी’ अचानक निखळल्याने रसिकांसह सा-यांना जणू काही ‘सदमा’ बसला आहे.अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली एक्झिटने सारेच हळहळले आहेत.दुबईत ...

हिंदी चित्रपटसृष्टीची ‘चांदनी’ अचानक निखळल्याने रसिकांसह सा-यांना जणू काही ‘सदमा’ बसला आहे.अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली एक्झिटने सारेच हळहळले आहेत.दुबईत ‘हवाहवाई’ श्रीदेवी यांचं निधन झाल्याची बातमी आली अन् अवघं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे.मात्र त्याचवेळी महानायक अभिनेता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टची सध्या चर्चा सुरु आहे.ही पोस्ट वाचून कुणालाही वाटेल की श्रीदेवी यांच्या निधनाचा बिग बींना जणू काही कुणकुण लागली होती.श्रीदेवी यांच्या निधनाच्या बरोबर काही तासांपूर्वी बिग बींनी ही पोस्ट केल्याचं बोललं जात आहे.‘न जानें क्यों अजीबसी घबराहट हो रही हैं’ अशी पोस्ट बिग बींनी केली आहे.हीच पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.अमिताभ यांनी ही पोस्ट का केली,त्यांना कळलं होतं का काही अशा विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.बिग बींना श्रीदेवींच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना दिली का असंही बोललं जात आहे.बिग बी आणि श्रीदेवी यांचा अभिनय असलेला खुदा-गवाह हा सिनेमा प्रचंड गाजला होता.बिग बींचे श्रीदेवी यांच्याशी चांगले संबंध होते.एक चांगली मैत्रीण असल्यानेच कदाचित बिग बींना ही कुणकुण लागली असावी असं बोललं जात आहे.श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.आपल्या अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.मात्र दुबईत पुतण्याच्या लग्नसोहळ्यासाठी गेले असताना श्रीदेवी यांनी आकस्मिक जगाचा निरोप घेतला.