Join us

​ आजोबा जितेन्द्र यांना लागला नातवाचा लळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 12:42 IST

tusshar kapoor shared his son laksshyas photo with father : लक्ष्यला खेळवण्यात जितेन्द्र यांचा बराच वेळ जातो. असेच लक्ष्यसोबत जितेंद्र खेळत असतानाचा फोटो तुषारने twitterवर पोस्ट केला आहे.

अभिनेता जितेन्द्र आजोबा झालेत, हे तुम्हाला ठाऊक आहेत. जितेन्द्र यांचा मुलगा तुषार कपूर याने लग्न न करता सिंगल पॅरेंट बनण्याचा निर्णय घेतला आणि जितेन्द्र यांनी तुषारच्या या निर्णयाला अगदी आनंदाने होणार दिला. त्यानुसार तुषारने सरोगसीद्वारे एका मुलाचा बाबा झाला. या बाळाचे नाव लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या तुषारच नाही तर आजोबा जितेन्द्र सुद्धा लक्ष्यचे कोडकौतुक करताना थकत नाहीयंत.लक्ष्यला खेळवण्यात जितेन्द्र यांचा बराच वेळ जातो. असेच लक्ष्यसोबत जितेंद्र खेळत असतानाचा फोटो तुषारने twitterवर पोस्ट केला आहे. यात लक्ष्य आजोबाच्या कुशीत मस्तपैकी पहुडलेला दिसतोय.  एका फोटोत आजोबा नातवंडासोबत खेळण्यात मस्तपैकी रमून गेलेले दिसताहेत.‘What are you looking at?...strike a pose, there's nothing to it!!!' ....Baap numbri beta dus numbri!!!’असे कॅप्शन त्याने या फोटोस दिले आहे. शिवाय या कॅप्शनला #love #family  असा टॅगही दिला आहे.   सरोगसीद्वारे पिता होण्याचा तुषारचा निर्णय अत्यंत धाडसी मानला गेला होता. या निर्णयानंतर बॉलिवूडमध्ये तुषारचे चांगलेच कौतुक झाले होते. सध्या तुषार त्याच्या बाळाची काळजी घेत आहे. बाळासोबतचे अनेक फोटो तो अधूनमधून सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. या आधी आमीर खान आणि शाहरुख खाननेदेखील सरोगसी आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा  वापर करून पितृत्व साध्य केले आहे. मात्र आमिर व शाहरूख या दोघांनी लग्नानंतर या तंत्रज्ञानाचा वापर केला, तर तुषारने लग्नापूर्वीच या तंत्रज्ञानाचा वापर करून पितृत्व प्राप्त केरून घेतले, हा यातील फरक.