Join us

​गोविंदाची ‘नं. १’ सिरिज पुन्हा येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 12:09 IST

नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टीत धुमाकुळ घातलेल्या ‘कुली नं. १’, ‘हीरो नं. १’, ‘बिवी नं. १’ यांसारख्या चित्रपटांचे रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या ...

नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टीत धुमाकुळ घातलेल्या ‘कुली नं. १’, ‘हीरो नं. १’, ‘बिवी नं. १’ यांसारख्या चित्रपटांचे रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.ईरॉस इंटरनॅशनल्ने वाशूू भगनानी यांच्या ‘पूजा इंटरटेनमेंट’कंपनीचे अर्धे शेअर विकत घेतले असून या डीलअंतर्गत सर्वप्रथम या तीन चित्रपटांचे रिमेक तयार करण्याची योजना आहे.गोविंदाची ‘नं. १’ चित्रपटांची सिरिज खूपच गाजली होती. हलक्याफुलक्या विनोदातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे चित्रपट म्हणून ते आजही टीव्हीवर आवडीने पाहिले जातात. त्यामुळे आजच्या काळानुरूप त्यांचे रिमेक बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ईरॉसतर्फे सांगण्यात आले की, वाशू भगनानी गेली दोन दशके बॉलिवूडमध्ये यशस्वी निर्माते म्हणून काम करत आहेत. त्यांच्यासोबत मिळून काम करताना प्रेक्षकांना अधिकाधिक मनोरंजनात्मक चित्रपट कसे बनवता येतील यावर भर दिला जाणार आहे.त्यादृष्टीने ‘नं. १’ सिरिजचे रिमेक हे पहिले पाऊल असेल असे म्हणायला काही हरकत नाही. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाईल.