Join us
Daily Top 2Weekly Top 5

Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:25 IST

गोविंदाला बुधवारी(१२ नोव्हेंबर) सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री अचानक चक्कर आल्याने गोविंदा घरातच बेशुद्ध होऊन पडला. गोविंदाच्या चाहत्यांना चिंता सतावत होती. आता गोविंदाने स्वत: त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. 

बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' असलेल्या गोविंदाला बुधवारी(१२ नोव्हेंबर) सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री अचानक चक्कर आल्याने गोविंदा घरातच बेशुद्ध होऊन पडला. त्यानंतर त्याला तातडीने जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या उपचारानंतर अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली होती. परंतु, गोविंदाच्या चाहत्यांना चिंता सतावत होती. आता गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर त्याने स्वत: त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गोविंदाच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. एएनआयशी बोलताना गोविंदाने त्याच्या चाहत्यांसाठी व्हॉइस नोट पाठवत हेल्थ अपडेट दिले. "मी ठीक आहे...तुम्हा सगळ्यांचा मी आभारी आहे", असं म्हणत गोविंदाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर गोविंदाने मीडियाशी संवाद साधला. "मी खूप व्यायाम केल्याने मला चक्कर आली.योगा-प्राणायम चांगलं आहे. पण, खूप व्यायाम कठीण गोष्ट आहे. मी माझी पर्सनालिटी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरांनी मला औषधं दिली आहेत", अशी प्रतिक्रिया गोविंदाने दिली. 

गोविंदाच्या जवळच्या मित्राने खुलासा केला की अभिनेत्याला काल संध्याकाळी डिसओरिएंटेशन अटॅक आला होता. तेव्हा गोविंदा घरीच होता. परंतु, काही वेळासाठी त्याची स्मृती गेली होती. त्यामुळे तो काहीसा गोंधळला आणि बेशुद्ध झाला. यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गोविंदाला मार्गदर्शन करण्यात आलं आणि औषधं देण्यात आली. परंतु संध्याकाळी त्याला पुन्हा अस्वस्थ वाटल्याने रात्री १ वाजता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता गोविंदाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Govinda Discharged: Health Update Given After Hospital Stay

Web Summary : Govinda, hospitalized after a dizzy spell, has been discharged. He thanked fans and said over-exercising caused fatigue. Doctors prescribed medication and advised rest. He is recovering well.
टॅग्स :गोविंदासेलिब्रिटी