Join us  

हिरो नंबर १ गोविंदाला फिल्मी करिअरमधील 'या' चुकीचा नेहमीच होतो पश्चाताप...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 9:07 AM

आता जो प्रश्न सर्वांच्या मनात येतो त्या प्रश्नाचं एकदा गोविंदाने उत्तर दिलं होतं. त्याने नेपोटिज्मवर खापर फोडलं नव्हतं. पण बॉलिवूडमधील अनेक पॉवर सेंटरबाबत सांगितलं होतं.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा एक असं नाव आहे ज्याला आजही लोक बॉलिवूडचा हिरो नंबर समजतात. त्याचं टॅलेंट सर्वांसमोर आलेलं आहे आणि त्याची स्टाइल जगभरात ट्रेन्ड करते. पण गोविंदाचं जे स्टारडम ९० च्या दशकात बघायला मिळालं ते आता राहिलेलं नाही. गेस्ट  म्हणून त्याला वेगवेगळ्या शोमध्ये बोलवलं जातं. पण त्याचा हिट सिनेमे देण्याचा सिलसिला पूर्णपणे थांबला आहे. अशात प्रश्न उपस्थित होतो की, अचानक असं काय झालं की, गोविंदाचं फिल्मी करिअर एकाएकी थांबलं? चला आज गोविंदाच्या वाढदिवशी याचं कारण जाणून घेऊ.....

आता जो प्रश्न सर्वांच्या मनात येतो त्या प्रश्नाचं एकदा गोविंदाने उत्तर दिलं होतं. त्याने नेपोटिज्मवर खापर फोडलं नव्हतं. पण बॉलिवूडमधील अनेक पॉवर सेंटरबाबत सांगितलं होतं. त्यावेळी गोविंदाने मान्य केलं होतं की, कोणत्याही मोठ्या ग्रुपसोबत जोडला गेला नसल्याने ही गोष्ट त्याच्या करिअरसाठी नुकसानकारक ठरली. जर तो कोणत्याही मोठ्या हाउस किंवा ग्रुपसोबत जोडलेला राहिला असता तर त्याला चांगले सिनेमे मिळाले असते. तो म्हणाला होता की, बॉलिवूड एक मोठा परिवार आहे. जर तुम्ही सगळे एकत्र चालत रहाल तुम्हाला काम मिळत राहणार. जर तुम्ही या परिवाराचा भाग राहिले तर तुमचं चांगलं होईल.

तसं गोविंदाला असंही वाटतं की, त्याच्या वाईट काळात इतरही अनेक लोकांनी त्याच्या अडचणीत भर घातली होती. त्यामुळे यातून बाहेर येण्याऐवजी दलदलमध्ये आणखी फसत गेला.

दरम्यान दिग्दर्शक डेविड धवनसोबत गोविंदाचा झालेला वाद लपलेला नाही. ज्या दिग्दर्शकासोबत गोविंदाने त्याच्या करिअरचे अनेक हिट सिनेमे दिले, ज्या दिग्दर्शकासोबत त्याला सुपरस्टारचा शिक्का लागला. आता स्थिती ही आहे की, दोघांनाही एकमेकांसोबत काम करायचं नाहीये. गोविंदाने डेविड धवनसोबत शोला और शबनम, कुली नंबर १, साजन चले ससुरालसारखे सिनेमे केले होते.

हे सगळं असूनही २००० सालानंतर गोविंदाने आपलं स्टारडम गमावलं. त्याने काही सिनेमात सहकलाकार म्हणून चांगलं काम केलं. पण त्याचे मुख्य भूमिका असलेले सिनेमे मात्र आपटले. 

टॅग्स :गोविंदाबॉलिवूड