Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुरमीतला जॉर्जियामध्ये चाहत्यांनी घेरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2016 17:55 IST

अभिनेता गुरमीत चौधरी सध्या जाम खूश आहे. एकतर त्याचा ‘वजह तुम ही हो’ हा चित्रपट येतोयं. शिवाय चाहत्यांकडून मिळणा-या ...

अभिनेता गुरमीत चौधरी सध्या जाम खूश आहे. एकतर त्याचा ‘वजह तुम ही हो’ हा चित्रपट येतोयं. शिवाय चाहत्यांकडून मिळणा-या अनपेक्षित प्रेमाने तो भारावून गेला आहे. चाहत्यांचे प्रेम पाहून गुरमीत मनोमन सुखावला आहे. होय, ‘वजह तुम ही हो’चे जॉर्जियामध्ये शूटींग सुरु होते. गुरमीत शूटींगसाठी सेटवर आला. पण तो येताच चाहत्यांना त्याला चांगलेच घेरले. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली. कुणाला गुरमीतसोबत सेल्फी घ्यायचा होता तर कुणाला त्याचा आॅटोग्राफ हवा होता. अनेक प्रयत्न करूनही गुरमीत या गर्दीतून बाहेर पडू शकला नाही. साहजिकच शूटींगचाही खोळंबा झाला. मग काय, कृपया बाजूला व्हा. शूटींग संपू द्या. मी तुम्हा प्रत्येका एक-एक करून भेटेल, अशी विनंती गुरमीतने केली. विशेष म्हणजे, त्याने आपला शब्द जशाच्या तसा पाळला. शूटींग संपेपर्यंत गुरमीतच्या भेटीसाठी चाहते ताटकळत राहिले. पण जशी शूटींग संपली गुरमीत प्रत्येकाला भेटला. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता. चाहत्यांचे ते प्रेम पाहून मी भारावून गेला. मी जॉर्जियात नसून भारतातच आहो, असेच एक क्षण मला वाटले, असे यानंतर गुरमीत म्हणाला.
‘वजह तुम ही हो’ या चित्रपटातील सना खान आणि गुरमीतचे हॉट सीन्स सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटात सनाने अतिशय बोल्ड सीन्स दिले आहेत. हे सीन्स देताना मी कधी नव्हे इतकी नर्व्हस होती, असे अलीकडे सनाने एका मुलाखतीत सांगितले.