Join us
Daily Top 2Weekly Top 5

गॉर्जियस श्रद्धा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 13:22 IST

श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सौंदर्य, उत्तम अभिनय आणि एक साकारलेल्या विविध भूमिकांमधून ती व्हर्सेटाईल कलाकार ...

श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सौंदर्य, उत्तम अभिनय आणि एक साकारलेल्या विविध भूमिकांमधून ती व्हर्सेटाईल कलाकार असल्याचे सर्वांनीच मान्य केले आहे. तिचे आत्तापर्यंतचे चित्रपटांमधून कसदार अभिनय पहायला मिळाला आहे.ती नुकतीच एअरपोर्टवर तिचे वडील (शक्ती कपूर) यांच्यासोबत दिसली होती. ती तिची बेस्ट फ्रेंड इशांका वही हिच्या लग्नाला कुटुंबियांसोबत जात होती. तिच्या मैत्रिणीच्या लग्नातील मेहंदीच्या विधीला ती उपस्थित होती. या सोहळ्यावेळी श्रद्धा अतिशय सुंदर दिसत होती. येथे शक्ती-शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी कोल्हापूरे, पंकज सारस्वत आणि चुलत भाऊ बहीण प्रियांक आणि वेदिका हे देखील उपस्थित होते.सुत्रांनुसार, कपूर आणि कोल्हापूरे कुटुंबियांसाठी ‘वही कुटुंबीय’ हे निकटवर्तीय आहेत. श्रद्धा आणि तिच्या बेस्ट फ्रेंड्स निमित्ताने एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम घालवला. शक्ती आणि श्रद्धा हे दोघे ताबडतोब आगामी कमिटमेंट्ससाठी मुंबईला रवाना झाले.