Join us

वरुण धवनच्या फॅन्ससाठी एक खूशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 16:19 IST

वरुण धवनच्या जुडवा 2 चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला पार केला आहे. वरुण धवन बॉलिवूडच्या न्यू जनरेशनचा स्टार आहे. 2017मध्ये ...

वरुण धवनच्या जुडवा 2 चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला पार केला आहे. वरुण धवन बॉलिवूडच्या न्यू जनरेशनचा स्टार आहे. 2017मध्ये वरुण धवनने दोन सुपरहिट दिले आहेत. ज्यामुळे सध्या तो यशाच्या शिखरावर आहेत. वरुण धवनच्या फॅन्ससाठी आमच्याकडे आणखीन एक खूशखबर आहे. हाँगकाँगच्या मॅडम तुसाद म्युझियममध्ये वरुण धवनचा  मेणाचा पुतळा तयार करण्यात येतो आहे. वरुणच्या आधी शाहरुख खान, सलमान खान, ह्रतिक रोशन, कॅटरिना कैफ, ऐश्वर्या राय बच्चन, करिना कपूर यांचे पुतळे लावण्यात आले आहेत.       मेण्याचा पुतळा बनवणारी टीम नुकतीच मुंबईत आली होती. त्यांनी वरुण धवनच्या शरीराचे माप घेतले. या खास गोष्टीला वरुण धवनने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर फॅन्ससोबत शेअर केले आहे. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत वरुणने सांगितले की, माझा आतापर्यंतचा प्रवास खूपच चांगला राहिला आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की माझा पुतळा हाँगकाँगच्या मॅडम तुसादमध्ये ठेवण्यात येणार आहे. वरुण पुढे म्हणाला, माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी खूपच उत्साहित असायचो. मात्र गेल्या 3 वर्षांपासून माझ्यात खूप बदल झाले आहेत. मी आता प्रत्येक गोष्टीला समजायला लागलो आहे. मला वाटते की माझा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला पाहिजे.  मी  माझा चित्रपटांना प्रत्येक फॅन्सपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.     जुडवा 2 नंतर वरुण धवन सलमान खानसोबत स्क्रिन शेअर कराताना दिसणार आहे. 'किक २'मध्ये सलमानसोबत वरुण असणार आहे.साजिद नाडीयादवालाने 'किक २' बद्दल दोघांशी बोलणी सुद्धा सुरु केली आहे आणि दोघांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. सूत्रानुसार  साजिदची टीम सध्या 'किक २' स्क्रिप्टवर काम करत आहे. जशी स्क्रिप्ट फायनल होईल तशी ती दोन्ही अभिनेत्यांना दिली जाईल. दोघांची केमिस्ट्री चित्रपटात पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील. साजिद नाडीयादवालाने 2014 मध्ये चित्रपट किकच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. हा चित्रपट त्या वर्षातील सगळ्यात हिट चित्रपट ठरला.