Join us

‘हेराफेरी ’च्या फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 10:46 IST

अक्षय कुमार, सुनील शेट्टी व परेश रावल यांच्या भूमिका असलेला सुपरहिट चित्रपट हेराफे रीचा तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला ...

अक्षय कुमार, सुनील शेट्टी व परेश रावल यांच्या भूमिका असलेला सुपरहिट चित्रपट हेराफे रीचा तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येऊ शकतो. या चित्रपटाबाबत अभिनेता सुनील शेट्टीने एक खुलासा केला असून, यावरून हा चित्रपट लवकरच फ्लोअरवर येऊ शकतो असे दिसते. हेराफेरी सिरीजचे दोन चित्रपट रिलीज झाले असून, दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरले होते. सुनील शेट्टीने एका कार्यक्रमात फिरोज नाडियाडवाला यांच्या सोबत झालेल्या चर्चांचा खुलासा केला. सुनील शेट्टी म्हणाला, ‘हेराफेरी ३’ हा चित्रपट निश्चितच तयार केला जाईल आणि तो सुपरहिट ठरेल असे फिरोजने मला सांगितले. यावेळी सुनील शेट्टी याने महत्त्वाची गोष्ट नमूद केली. या चित्रपटात मी, अक्षय व परेश आम्ही तिघेही काम करू, आमच्या शिवाय या चित्रपटाबद्दल विचारच केला जाऊ शकत नाही, असेही सुनील शेट्टीने सांगितले. हेराफेरी विषयी सुनील शेट्टीने व्यक्त केलेले मत अगदी योग्य आहे. या तिघांनी हेराफेरीमध्ये धमाल केली होती. फिर हेराफेरीमध्ये ही जोडी कायम होती व चित्रपट सुपरहिट ठरला होता. अक्षय कुमार याने राजू, सुनील शेट्टीने श्याम व परेश रावलने बाबूराव या भूमिका साकारल्या होत्या. आजही हा चित्रपट कॉमिक टायमिंगसाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो. काही दिवसांपूर्वी हेराफेरी सिरीजचा तिसरा चित्रपट बंद पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, सुनील शेट्टीने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला तर प्रेक्षकांना हेराफे रीच्या गुदगुल्या पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. अक्षय कुमार सध्या बºयाच चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त आहे तर परेश रावल यांनी राजकारणांत प्रवेश केला आहे. सुनील शेट्टी मागील काही वर्षांत रुपेरी पडद्यापासून दूर आहे. अक्षय कुमार याने वेळ मिळाल्यास दारा सिंग यांच्या बायोपिकमध्ये काम करेल अशी कबुली दिली आहे.