Join us

Good News : या तारखेला होणार रणवीर सिंगची दीपिका पादुकोण, लग्नाची तारीख आलीसमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 15:11 IST

गतवर्षीपासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहु लागले आहेत असे म्हटले तर वावगे ठरु नये. याची सुरुवात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि ...

गतवर्षीपासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहु लागले आहेत असे म्हटले तर वावगे ठरु नये. याची सुरुवात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीने केली त्यानंतर अनेक छोट्या पडद्यावरील कलाकार ही लग्नाच्याबेडीत अडकले. नुकतेच सोनम कपूरवे देखील बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत सातफेरे घेतले आहेत. यानंतर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ते दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाकडे. बी-टाऊनमध्ये सध्या दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचीच चर्चा आहे. याबाबत दोघांनी मात्र अजून मौन बाळगले आहे. आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले होते की नोव्हेंबरमध्ये दीपिका आणि रणवीर लग्न करणार आहेत. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार दीपिका आणि रणवीरचे लग्न 18 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 19 नोव्हेंबरला लग्न होणार आहे. लग्नाच्या तयारीत कसू भरही कसल्याच गोष्टीची कमी पडू नये यासाठी दीपिकाच्या टीममधील प्रत्येकाला नोव्हेंबरमध्ये एकही सुट्टी घ्यायची नाही अशी ताकिद देण्यात आली आहे. दीपिकाच्या मेकअप आर्टिस्ट पासून ते मॅनेजरपर्यंत सगळ्यांना लग्नादरम्यान हजर राहण्याचे आदेश आहेत. अजून दीपिकाच्या पीआर टीमकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी दीपिका आपल्या आईसोबत दागिण्यांची खरेदी करताना दिसली होती. बंगळुरु आणि मुंबईतल्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. ALSO READ :  रणबीर कपूरने दिली दीपिका पादुकोणवरच्या प्रेमाची कबुली; व्हिडीओ व्हायरल!दीपिका व रणवीर या दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग हवे आहे. रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. त्यामुळे लग्नासाठी बीच वेडिंगचा पर्याय निवडला होता. पण त्यांच्या कुटुंबाना मात्र हे मान्य नाही. त्यामुळे हे लग्न मुंबईतचं होण्याची शक्यता अधिक आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार जवळपास सगळचे नातेवाईक मुंबईत आहेत.  डेस्टिनेशन वेडिंग केल्यास त्यांना सहभागी होता येणार नाही.