Join us

एक आनंदाची बातमी !! ​अखेर ‘या’ शोमधून परतणार कपिल शर्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 11:57 IST

कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, तुमचा आमचा लाडका कपिल शर्मा लवकरच एका नव्या-को-या टीव्ही शोमधून परतणार ...

कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, तुमचा आमचा लाडका कपिल शर्मा लवकरच एका नव्या-को-या टीव्ही शोमधून परतणार आहे. या शोचे नाव असेल ‘आदत से मजबूर’.गेल्या काही दिवसांत कपिल शर्माच्या करिअरची गाडी रूळांवरून घसरली होती. पण कदाचित ती हळूहळू  रूळावर येतेय. आधी कपिलचा सुनील ग्रोवरसोबत वाद झाला. मग सुनील शो सोडून गेला आणि कपिलच्या शोचा टीआरपी घसरला. त्यातून कसाबसा सावरत नाही तोच कपिलला आजारपणाने (?) घेरले. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, ताण अशा सगळ्यांमुळे कपिलच्या शोचे शूट वारंवार रद्द होऊ लागले.  अखेर कपिलचा शो आॅफ एअर करण्याचा निर्णय संबंधित चॅनलने घेतला. माझा शो बंद झालेला नाही तर मी केवळ ब्रेक घेतलायं, असे यानंतर कपिल सध्या ओरडून ओरडून सांगावे लागले. पण आता कपिल खरेच येतो आहे. ‘बॉम्बे टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, कपिलच्या शोच्या सेटवरच ‘आदत से मजबूर’चे काही भाग शूट केले गेले आहेत. तो सुट्टीवर जाण्यापूर्वीच या भागांचे शूटींग झाले होते. या शोच्या काही भागांमध्ये कपिल झळकणार आहे. अर्थात  हा शो कधीपासून सुरू होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.ALSO READ : कपिल शर्मा व गिन्नी चतरथचे ब्रेकअप! किती खरे, किती खोटे!! वाचा, आणखी एक धक्कादायक बातमी! लवकरच कपिलचा ‘फिरंगी’ हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. त्यापूर्वी कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ चर्चेत होतो. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, अतिताण यामुळे कपिला आपल्या शोचे शूटींग तब्बल सहा वेळा रद्द करावे लागले होते.  शाहरुख खान, अक्षय कुमार , अर्जुन कपूर, अनिल कपूर, अजय देवगण अशा अनेक कलाकारांना शूट न करताच परतावे लागले होते. यानंतर सोनी टीव्हीने कपिलला काही काळ ब्रेक घेण्याचा सल्ला दिला होता. कपिलनेही हा सल्ला मानला. मध्यंतरी उपचारासाठी कपिल बेंगळुरूतील होलिस्टिक हेल्थकेअर सेंटरमध्ये गेला होता.खरे तर बेंगळुरूच्या या हेल्थ सेंटरमध्ये कपिल ४० दिवस उपचार घेणार होता. पण तो १२ दिवसांतच परत आला आहे. उपचार अर्धवट सोडून परतण्यामागेही ‘फिरंगी’ हा चित्रपट होता.