Join us

GOOD NEWS !! ​बॉलिवूडमध्ये जायचेयं तर सलमान खानला पोर्टफोलिओ पाठवा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 16:26 IST

‘जिसका कोई नहीं, उसका सलमान खान है,’असे म्हटले तर वावगे ठरू नये. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, सलमानने बॉलिवूडमध्ये अनेकांना ...

‘जिसका कोई नहीं, उसका सलमान खान है,’असे म्हटले तर वावगे ठरू नये. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, सलमानने बॉलिवूडमध्ये अनेकांना संधी दिली आहे. मग ते अभिनेते असो वा अभिनेत्री. कॅटरिना कैफ, जरीन खान, डेझी शाह, सोनाक्षी सिन्हा,अथिया शेट्टी अशा अनेकींना सलमानने मदत केली. सूरज पांचोलीला या आदित्य पांचोलीच्या मुलालाही सलमाननेच संधी दिली. सलमानमुळे बॉलिवूडमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करू शकणा-या अशा अनेकांची नाव घेता येतील. खरे तर प्रत्येक नव्या अभिनेता, अभिनेत्रीचे सलमानसोबत स्क्रीन शेअर करण्याचे स्वप्न असते.पण आता ही संधी तुम्हा-आम्हाला मिळाली तर?आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे. बॉलिवूडमध्ये येऊ पाहणा-या नव्या टॅलेंटसाठी सलमान एक सुवर्णसंधी घेऊन आला आहे. होय, स्वत: सलमानने याबाबत tweet केले आहे. होय, सलमानने त्याच्या  ‘सलमान खान प्रॉडक्शन’अंतर्गत नव्या टॅलेंटला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा एक  व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ‘बिइंग इन टच’ या अ‍ॅपच्या साह्याने सलमान अनेकांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. या अ‍ॅपच्या मदतीने चित्रपटसृष्टीत करिअर करु इच्छिणा-यांना त्यांचे पोर्टफोलिओ पाठवण्याचेआवाहन त्याने केले आहे.  ALSO READ :  पुढचे ११ दिवस सलमान खान जाणार अज्ञातवासात!तूर्तास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानला हिरोईनचा शोध आहे. या भूमिकेसाठी त्याला २० ते २५ वयोगटातील मुलीची गरज आहे. अर्थात twitterरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलमानने याबाबतचा खुलासा केलेला नाही. पण सलमानच्या या टिष्ट्वटला प्रतिसाद मात्र चांगला आहे. अनेकांनी त्याचे ते tweet retweet केले आहे. शेवटी बॉलिवूडमध्ये करिअर करू इच्छिणा-यांना सलमान मदत देऊ करत असेल तर ती कोण नाकारेल. त्यामुळे येत्या काळात सलमानच्या प्रॉडक्शन कंपनीत कोणता नवा चेहरा इंडस्ट्रीत एन्ट्री घेणार, हे दिसेल. तुम्हीही बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या तयारीत असाल तर सलमानची मदत घ्यायला हरकत नाही. शेवटी बॉलिवूडमध्ये गॉडफादर हवाच. गॉडफादर स्वत:च आपल्याकडे चालून आला म्हटल्यावर देर करायची कशाला. तर लागा कामाला....!