GOOD NEWS : बॉलिवूडचे ‘हे’ दोन खान येणार एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 15:10 IST
बॉलिवूडचे दोन ‘खान’ लवकरच एकत्र येणार आहेत. होय, हे दोन ‘खान’ म्हणजे, बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान आणि बॉलिवूडचा मिस्टर ...
GOOD NEWS : बॉलिवूडचे ‘हे’ दोन खान येणार एकत्र!
बॉलिवूडचे दोन ‘खान’ लवकरच एकत्र येणार आहेत. होय, हे दोन ‘खान’ म्हणजे, बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान आणि बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान. शाहरूख व आमिर या दोघांना एकत्र काम करताना पाहणे, म्हणजे सिनेप्रेमींचे एक मोठे स्वप्न सत्यात येण्यासारखे आहे. पण जरा थांबा, त्याआधी पुढचे वाक्य वाचा. हे दोघे, एकत्र येणार हे खरे असते तरी ते कुठल्याशा चित्रपटासाठी नव्हे तर एका कमर्शिअलसाठी एकत्र येत आहेत. होय, एका खासगी वाहिनीच्या ‘नई सोच’ या अभियानाशी शाहरुख लवकरच जोडला जाणार आहे. आमिर खान आधीपासूनच या अभियानाशी जोडला गेला आहे. या अभियानाच्या एका जाहिरातीत आमिर खान सरदारजीच्या वेशात दिसला होता. ही जाहिरात लोकांना अतिशय आवडली. आता शाहरूखही ‘टेड टॉक्स: नई सोच’ होस्ट करताना दिसणार आहे. या शोमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा करुन एकमेकांचे विचार कळतील. १८ मिनिटांचा हा कार्यक्रम असेल. टेड पहिल्यांदाच इंग्रजी भाषेपेक्षा वेगळ्या भाषेमध्येही प्रदर्शित केले जाणार आहे.अलीकडे शाहरूखने आमिरसोबतचा एक सेल्फि पोस्ट केला होता. आम्ही एकमेकांना गत २५ वर्षांपासून ओळखतो. पण आम्हा दोघांचा हा पहिला एकत्र फोटो आहे, असे त्याने लिहिले होते.निश्चितपणे शाहरूख या टीव्ही शोसाठी प्रचंड उत्सूक आहे. टेलिव्हिजन एक सक्षम माध्यम आहे. याद्वारे समाजाला चांगला संदेश देता येऊ शकतो. या शोच्या माध्यमातून मी तरूणांना प्रेरिक करू शकेल असा मला विश्वास आहे, असे शाहरूख याबद्दल बोलला होता. आता त्याचा हा विश्वास किती सार्थ होतो, ते कळलेच.