Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली देऊ शकतात ही गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 14:49 IST

दिवाळित खूप लोकांना वेगवेगळे सरप्राईज किंवा गिफ्ट मिळाले असतील. नुकतीच दिवाळी संपली आहे मात्र बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या फॅन्सना ...

दिवाळित खूप लोकांना वेगवेगळे सरप्राईज किंवा गिफ्ट मिळाले असतील. नुकतीच दिवाळी संपली आहे मात्र बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या फॅन्सना अजून एक सेलिब्रेशन करण्याची संधी मिळणार आहे. स्पॉटब्वॉयच्या रिपोटनुसार अनुष्का शर्मा आणि विराट कोहली डिसेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलात भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि बॉलिवूड ब्युटी अनुष्का शर्मा लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. यासाठी डिसेंबरमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यातून विराटने सुट्टी घेतली आहे. BCCI ला दिलेल्या  एप्लीकेशनमध्ये त्यांने सुट्टीचे कारण पर्सनल सांगितले आहे. ऐवढेच नाही तर अनुष्काच्या काही जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की डिसेंबर महिन्यात तिला शूटिंग करायचे नाही आहे. त्यामुळे दोघे ही डिसेंबर महिन्यात लग्न करण्याच्या विचारात आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र याचे खरं उत्तर वेळच देईल.  नुकतेच दोघे मान्यवरच्या अॅडमध्ये एकत्र दिसले होते. या अॅडची थीम लग्नावर आधारित होती. यात ते दोघे एकमेकांसोबत सात वचन देताना दिसत होते.  विराट अनुष्काला लाडाना ‘नुष्की’ या नावाने हाक मारतो. ‘विरूष्का’ नावाने ओळखल्या जाणा-या या जोडीचे प्रेम आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. खरे तर विराट व अनुष्काने ते कधीही लपवलेही नाही.ALSO READ :  VIDEO:आयुष्यभर तुझी साथ निभावेन,रोमँटिक अंदाजात विराटची अनुष्काला प्रेमाची कबुलीविराट आणि अनुष्का या दोघांमध्ये २०१३ पासून अफेअर सुरु आहे. २०१५ च्या सुरुवातीला दोघांचेही ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. मात्र यानंतर मार्च २०१६ मध्ये दोघेही एकत्र दिसले आणि यांच्या प्रेमाच्या चर्चा पुन्हा होऊ लागल्या. गत वर्षी दोघांनीही डेहराडून येथे नाताळ साजरा केला होता. युवराज सिंह व हेजल किच हे दोघे त्यांचे खास अतिथी होते. यावर्षी मे महिन्यात जहिर खान व सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याला दोघेही लव्हबर्ड्स एकत्र पोहोचले होते.अनेक मॉचेस दरम्यान अनुष्का त्याला भेटण्यासाठी परदेशी जाताना हि दिसली आहे. विराट कोहली टीम इंडियाचा कॅप्टन आहे तर अनुष्का बॉलिवूडमधली टॉपची अभिनेत्री आहे.