Join us

‘बी’ टाऊनमध्ये हवी सुदृढ स्पर्धा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 15:49 IST

 अभिनेता अर्जुन कपूर हा त्याचा अभिनय, स्किल्स यांच्याबद्दल खूपच आत्मविश्वासू असतो. ईशकजादे, २ स्टेट्स, तेवर, आणि की अ‍ॅण्ड का ...

 अभिनेता अर्जुन कपूर हा त्याचा अभिनय, स्किल्स यांच्याबद्दल खूपच आत्मविश्वासू असतो. ईशकजादे, २ स्टेट्स, तेवर, आणि की अ‍ॅण्ड का मध्ये अभिनय केल्याने त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला. सध्या बॉलीवूडमध्ये त्याचे स्थान हे अढळ झाले आहे. तो प्रत्येक चित्रपट करत नाही.तर जोपर्यंत त्याला एखादी स्क्रिप्ट आवडत नाही तोपर्यंत तो चित्रपट करत नाही. चांगले काम आणि चांगला रिझल्ट यांच्यात अर्जुन विश्वास ठेवतो. तो म्हणतो,‘ सध्या बी टाऊनमध्ये जे स्पर्धेचे वातावरण आहे. ते अतिशय उत्तम असून सुदृढ स्पर्धा ही असलीच पाहिजे. त्याशिवाय काम करण्यात मजा ती काय?