Join us

‘गोलमाल ४’ हा ‘सुधू कव्वुम’ चा रिमेक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 10:22 IST

‘गोलमाल’ चित्रपटाची सीरिज चाहत्यांचे प्रचंड  मनोरंजन करते. आतापर्यंत ‘गोलमाल’ चे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून लवकरच ‘गोलमाल ४’ चित्रपट ...

‘गोलमाल’ चित्रपटाची सीरिज चाहत्यांचे प्रचंड  मनोरंजन करते. आतापर्यंत ‘गोलमाल’ चे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून लवकरच ‘गोलमाल ४’ चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट ‘गोलमाल ४’ हा तमिळ चित्रपट ‘सुधू कव्वुम’ चा रिमेक नाही, असे सांगण्यात आले आहे.मात्र असेही कळाले आहे की, चित्रपटात अजय देवगण असणार आहे. आणि अद्याप चित्रपटाचे कथानक, कास्टींग हे गुपीत ठेवण्यात आले आहे. रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे अ‍ॅक्शन, रोमान्स, कॉमेडी आणि कम्प्लिट मनोरंजन. आता यात काय नवे असणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.