GOLDEN CHANCE !! तुमचे नाव सेजल असेल तर तुम्ही भेटू शकता शाहरूख खानला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 14:59 IST
बॉलिवूड किंग शाहरूख खान याला भेटण्याची इच्छा कुणाला नसेल? केवळ शाहरूखची एक झलक पाहायला मिळावी म्हणून त्याच्या घरासमोर तासन् ...
GOLDEN CHANCE !! तुमचे नाव सेजल असेल तर तुम्ही भेटू शकता शाहरूख खानला!
बॉलिवूड किंग शाहरूख खान याला भेटण्याची इच्छा कुणाला नसेल? केवळ शाहरूखची एक झलक पाहायला मिळावी म्हणून त्याच्या घरासमोर तासन् तास ताटकळत बसणारे अनेक आहेत. मग अशात खुद्द शाहरूखला प्रत्यक्ष भेटण्याचीच संधी मिळाली तर? तर अशी संधी चालून आलीय. होय, तुम्ही शाहरूखला अगदी प्रत्यक्ष भेटू शकणार आहात. अर्थात तुमचे नाव सेजल असेल तरच. तुमचे नाव सेजल असेल तर एका नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि शाहरूख खानला भेटा, अशी एक संधी तुमच्यापुढे आहे. अर्थात ही ‘जब हॅरी मेट सेजल’ या शाहरूखच्या आगामी चित्रपटाच्यसच्या प्रमोशनसाठी निर्मात्यांनी लढवलेली आगळीवेगळी शक्कल आहे, हे सांगायला नकोच. प्रमोशनचा भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या ‘सेजल’ला शाहरुख तिच्या शहरात येऊन भेटणार आहे. यासाठी करायचे काय तर, सोप्पे आहे. या स्पर्धेसाठी सेजल नाव असणाºया मुलींनी 08647222 या क्रमांकावर जास्तीत जास्त मिस्ड कॉल्स द्यायचे आहेत. ज्या शहरातून सर्वात जास्त मिस्ड कॉल येणार त्या शहराला शाहरुख भेट देणार आहे. तेव्हा सेजल नाव असलेल्या मुलींनी ही संधी घालवता कामा नये. चला, तर लागा कामा आणि द्या मिस कॉल. शाहरूखला भेटायचे तर इतके तर करावेच लागेल ना?दिग्दर्शक इम्तियाज अलीचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा सिनेमा एक पंजाबी मुलगा आणि गुजराती मुलीच्या प्रेमकहाणीवर आधारित आहे. याच शाहरुख खान पंजाबी मुलाची तर अनुष्का शर्मा पहिल्यांदाच गुजराती मुलीची भूमिका करणार आहे. हा सिनेमा येत्या आॅगस्ट महिन्यात देशभरात प्रदर्शित होणार आहे.