अक्षय आणणार देशासाठी ‘गोल्ड’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 21:24 IST
सलमान खानला ‘सुल्तान’मध्ये व आमिर खानला ‘दंगल’मध्ये ज्या गोष्टींचे दु:ख आहे. ते दु: ख या अक्षय कुमार हलके करणार ...
अक्षय आणणार देशासाठी ‘गोल्ड’
सलमान खानला ‘सुल्तान’मध्ये व आमिर खानला ‘दंगल’मध्ये ज्या गोष्टींचे दु:ख आहे. ते दु: ख या अक्षय कुमार हलके करणार आहे. 15 आॅगस्ट 2018 रोजी तो देशासाठी आॅलिंपिक ‘गोल्ड’ घेऊन येणार आहे. वाचून थोडे अचंबित झाला ना! अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘गोल्ड’ आहे. अक्षयचा हा चित्रपट 2018 साली 15 आॅगस्टला रिलीज होणार आहे. अक्षयने ही माहिती आपल्या चाहत्यांना ट्विटर पोस्टद्वारे दिली आहे. अर्थातच हा चित्रपट खेळावर आधारित असून स्वतंत्र भारताने ‘लंडन आॅलिंपिक’मध्ये मिळविलेल्या पहिल्या पदकाचा आनंद साजरा करीत तो देशभक्तीची भावना जागविणार आहे. ‘एअरलिफ्ट’ व ‘रुस्तम’मध्ये देशभक्ताच्या रुपात दिसलेला अक्षय लोकांना चांगलाच भावला होता. याचमुळे त्याचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरले होते. दुसरीकडे 2016 या वर्षांत खेळावर आधारित तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यापैकी ‘सुल्तान’ व ‘एमएस ढोनी : अनटोल्ड स्टोरी’ या दोन चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर धमाल केली आहे. तर आमिर खानचा बहुचर्चित ‘दंगल’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून आमिरचा हा चित्रपट हिट ठरले असा अंदाज लावण्यात येत आहे. }}}} खेळ आणि देशभक्तीचा मेळ घालत अक्षय कुमारने ‘गोल्ड’ची कास धरली असावी. या चित्रपटाची पार्श्वभूमी स्वातंत्र्यानंतरच्या देशभक्तीच्या लाटेची असून हॉकीमध्ये मिळविलेले पहिले स्वर्णपदक देशाच्या विकासात किती महत्त्वाचे ठरले हे दर्शविणारे असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती करणार आहे. यापूर्वी रीमाने ‘तलाश’ व ‘हनिमून ट्रव्हलर्स प्रायव्हेट लिमिटेड’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. फरहान अख्तर व रितेश सिधवानी यांच्या ‘एक्सेल इंटरटेनमेंट’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.