Join us

बेडवर जाण्यापूर्वी मीराला काय म्हणतो शाहीद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 13:21 IST

Koffee with Karan new promo: Mira Rajput to steal the thunder from Shahid Kapoor : Koffee with Karan : Mira Rajput Shahid Kapoor : मीरा राजपूत लवकरच तिचा लाडका हबी शाहीद कपूर याच्यासोबत टेलिव्हिजन डेब्यू करणार आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅटशोमध्ये मीरा व शाहीद सामील होणार आहेत.

मीरा राजपूत लवकरच तिचा लाडका हबी शाहीद कपूर याच्यासोबत टेलिव्हिजन डेब्यू करणार आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅटशोमध्ये मीरा व शाहीद सामील होणार आहेत. येत्या १ जानेवारीला मीरा व शाहीदचा ‘कॉफी विद करण’चा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. काही दिवसांपूर्वी मीरा व शाहीदच्या या एपिसोडचा पहिला प्रमो रिलीज झाला. यात पहिल्यांदा मीरा बोलताना दिसली. या प्रमोमध्ये शाहीदपेक्षाही मीराच अधिक बोलली. आता या एपिसोडचा आणखी एक प्रमो रिलीज झाला आहे. यात करण मीराला एक खट्याळ प्रश्न करतोय. बेडवर जाण्यापूर्वी साशा(शाहीद कपूरचे घरचे नाव) तुला काय म्हणतो? असे करणने विचारले. यावर मीरानेही तितकेच खट्याळ उत्तर दिले. कुछ कुछ होता है...असे ती म्हणाली.या दोन्ही प्रमोत मीरा एकदम कूल आणि बिनधास्त दिसतेय. पहिल्यांदा कॅमेरा फेस करत असूनही मीरा अगदी सराईतपणे कॅमेºयाला सामोरे गेलीय. करणच्या एकाही प्रश्नाने ती गांगरली नाही. उलट तिने तितक्याच उत्स्फूर्तपणे या प्रश्नांची उत्तरे दिलीत. खरे तर मीरा आणि शाहीद यांचे लग्न म्हणजे अरेंज मॅरेज. शाहीद -मीराच्या लग्नाची स्टोरी ऐकून तुम्हाला शाहीदचा ‘विवाह’ हा सिनेमा आठवल्याशिवाय राहणार नाही. ‘विवाह’मध्ये संस्कारी प्रेम (शाहीद कपूर) सर्वप्रथम पूनम(अमृता राव) हिला भेटतो, तो प्रसंग तुम्हाला आठवत असेलच. शाहीद आणि मीरा सुद्धा अगदी असेच भेटले. शाहीद मीराच्या घरी तिला पाहायला गेल्या. मोठ्यांच्या गप्पा-टप्पा झाल्या आणि यानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी शाहीद व मीराला काही वेळाचा एकांतवास दिला गेला. यात फरक इतकाच की, प्रेम आणि पूनम घराच्या गच्चीवर एकमेकांना भेटले तर शाहीद व मीरा हे दोघे त्यांच्या एका मित्राच्या फार्म हाऊसवर भेटले. यावेळी दोघांनीही एकमेकांना समजून घेतले. या फार्म हाऊसवर मीरा व शाहीद तब्बल सात तास एकमेकांशी बोलले. आहे ना इंटरेस्टिंग...इतके सगळे ऐकल्यानंतर मीरा व शाहीदला ‘कॉफी विद करण’मध्ये पाहण्यास तुम्ही उत्सूक असालच. होय ना? }}}}}}}}