Join us

रणवीरच्या ‘खिल्जी’ लूकची झलक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 12:15 IST

 रणवीर सिंगची ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील भूमिका ‘बी टाऊन’च्या कलाकारांनी डोक्यावर घेतली. त्याच्या चित्रपटातील अभिनयाचे समीक्षकांनीही कौतुक केले. आता तो ...

 रणवीर सिंगची ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील भूमिका ‘बी टाऊन’च्या कलाकारांनी डोक्यावर घेतली. त्याच्या चित्रपटातील अभिनयाचे समीक्षकांनीही कौतुक केले. आता तो पुन्हा एकदा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी बहुचर्चित ‘पद्मावती’ चित्रपटासाठी चर्चेत आहे.यात दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शाहिद हा दीपिकाच्या पतीची ‘राजा रतनसेन’ ची भूमिका करतो आहे. चित्रपटाच्या बाबतीत केवळ रणवीरच्या लुकचीच चर्चा प्रचंड आहे.नुकताच त्याच्या लुकची एक झलक आऊट झाली आहे. यात त्याच्या डोळयातील क्रूरता आणि खिल्जी हा अतिशय रूथलेस राजा वाटतोय. आणि रणवीर या भूमिकेला न्याय देतोय असे त्याच्या लुककडे पाहिल्यावर कळतेय...