Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ही’ तरुणी शूटिंग बघायला गेली अन् अभिनेत्री झाली, वाचा तिचा अभिनय प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 18:28 IST

या तरुणीची ओळखच ही आहे की, ती यू-ट्यूबची चांदणी आहे. कारण तिचा भोजपुरी अल्बम रिलीज होताच वाºयासारखा व्हायरल होतो. ...

या तरुणीची ओळखच ही आहे की, ती यू-ट्यूबची चांदणी आहे. कारण तिचा भोजपुरी अल्बम रिलीज होताच वाºयासारखा व्हायरल होतो. ‘डोली में गोली मार देब, चोंए चोंए’नंतर चांदणी सिंगचा ‘खोद देव ढोढी पिचकारी’ हा नवा अल्बम तुफान लोकप्रिय होत आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील राहणारी चांदणी सिंग सध्या निर्माता आणि दिग्दर्शक अरविंद चौबे यांच्या ‘मैं नागिन तू सपेरा’ या चित्रपटात अरविंद अकेला कल्लू याच्या अपोझिट बघावयास मिळत आहे. या चित्रपटामुळे सध्या चांदणी चांगलीच उत्साहात आहे. ती दिव्या भारतीला तिची फेव्हरेट अभिनेत्री मानते. चांदणीने तिच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगताना म्हटले की, ‘मी पटना येथे एका कामासंदर्भात आली होती. त्याठिकाणी मला शूटिंग बघण्याची संधी मिळाली. तेथे आदिशक्ती म्युझिक कंपनीच्या एका अल्बमची शूटिंग सुरू होती. त्याचठिकाणी मला आदिशक्तीचे मनोजजी यांनी अभिनय करणार काय? असे विचारले. मी काही बोलणार तोच माझ्या मैत्रिणींनीच होय असे म्हटले. त्यानंतर अल्बम जगतात पाऊल ठेवले. हा अल्बम खेसारीलाल यादव यांच्यासोबत होता. ‘डोली में गोली मार देब’ असे त्या अल्बमचे नाव होते. हा अल्बम हिट झाला. त्यानंतर ‘चोंए चोंए आयी’ हा माझा अल्बम आला. तोदेखील हिट झाला. पुढे मला चित्रपटाच्या आॅफर्स मिळत गेल्या. कल्लूजी यांच्यासोबतच्या ‘धनिया आवतानी’ हा अल्बम एकाच दिवसात जवळपास दहा लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला. आज जरी मी भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करीत असली तरी, लोक मला अल्बममुळेच ओळखतात. मी अल्बममध्ये काम करणे माझ्या घरातील सदस्यांना फारसे सकारात्मक वाटत नव्हते. घरातील सदस्यांपेक्षाही शेजारी आणि नातेवाइकांनाच अधिक अडचण वाटत होती. मात्र हळूहळू त्यांनी मला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. आता मी अभिनयातच करिअर करणार असल्याचे चांदणीने सांगितले.