Join us

शाहरुख खानने पहिल्या कामाईतून दिवाळीमध्ये गौरी खानसाठी खरेदी केले होते हे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 13:15 IST

शाहरुख खान आणि गौरी खानची प्रेम कहाणी जग जाहीर आहे. तुम्हाला आम्ही शाहरुखचा दिवाळी संबंधीत एक किस्सा सांगणार आहोत. ...

शाहरुख खान आणि गौरी खानची प्रेम कहाणी जग जाहीर आहे. तुम्हाला आम्ही शाहरुखचा दिवाळी संबंधीत एक किस्सा सांगणार आहोत. शाहरुख खानने आपल्या चित्रपटाच्या साईनिंग अमाउंटवररुन आपल्या पत्नी आणि मित्रांसोबत दिवाळीचे सेलिब्रेशन केले होते. 1992 साली शाहरुखने दिवाळीच्या दोन- तीन महिने आधी राजू बन गया जेंटलमॅन चित्रपट साईन केला होता. शाहरुखला दिवाळीच्या आधी चित्रपटाची साईंग अमाउंट मिळाली होती यातून त्यांने आपल्या मित्रांसाठी गिफ्ट्स विकत घेतले होते तर पत्नी गौरीच्या आवडता ड्रेस खरेदी केला होता.   एका इंटरव्ह्यू दरम्यान शाहरुखने आपल्या दिवाळीतील आठवणींना उजाळा दिला होता. शाहरुख म्हणाला होता कि त्यादिवसांमध्ये माझ्याकडे पैसे नसायचे. आईने दिलेल्या पॉकेटमनीमध्ये महिना चालवायचा असायचा. मला दिवाळी हा सण खूप आवडायचा मोठ्या उत्साहाने मी या सणाची वाट बघायचो.  ज्यावेळी मेस सिप्पी साहेबांनी मला दिवाळीमध्ये माझ्या चित्रपटाची साईंग अमाऊंट दिली होती. त्यावेळी मी सगळ्या मित्रांसाठी खूप गिफ्ट्स खरेदी केले होते आणि गौरीसाठी तिचा आवडता ड्रेस देखील घेतला होता.  राजू बन गया जेंटलमॅन हा शाहरुख खानचा पहिला रिलीज झालेला चित्रपट नव्हता. पण हा माझा पहिला साईन केलेला चित्रपट होता.  आज ही शाहरुखला दिवाळीच्या दिवसात त्याच्या या चित्रपटाची आठवणी येते आणि त्याला असे नेहमीच वाटते यापेक्षा जास्त चांगला उपयोग त्यांने कधीच पैशांचा केला नसेल.   ALSO RAED :  सुपरस्टार झाल्यानंतरही घर चालवण्यासाठी शाहरुख खान करायचे 'हे' काम जेब हॅरी मेट सेजल चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर तो सध्या एक हिट चित्रपटाच्या शोधात आहे. आनंद एल राव यांच्या आगामी चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात  कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा ही दिसणार आहे. २०१८ मध्ये हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात शाहरुख आपल्या २५ कारकिर्दीत पहिल्यांदा बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे. शाहरुखचे फॅन्स त्याच्या या चित्रपटाची वाट नक्कीच आतुरतेने बघत असलीत यात काही शंका नाही.