कोण आहेत बॉलिवूडच्या ग्लॅमरस आणि बोल्ड गायिका जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 12:27 IST
'जो दिखता है वहीं बिकता है' असं ब-याचदा मनोरंजन दुनियेच्या बाबतीत म्हटलं जातं. बॉलिवूडच्या बाबतीत तर हे तंतोतंत लागू ...
कोण आहेत बॉलिवूडच्या ग्लॅमरस आणि बोल्ड गायिका जाणून घ्या
'जो दिखता है वहीं बिकता है' असं ब-याचदा मनोरंजन दुनियेच्या बाबतीत म्हटलं जातं. बॉलिवूडच्या बाबतीत तर हे तंतोतंत लागू पडतं. इथं टॅलेंटच्या आधी गरजेचं असते ती सुंदरता.सौंदर्याची चर्चा होते तेव्हा बॉलिवूडच्या नायिकांना तोड नाही.बॉलिवूड अभिनेत्रींचे चाहते देशातच नाहीतर सा-या जगात आहेत.बॉलिवूडमधील एक घटक असा आहे की जो कायमच बोल्डनेस आणि ग्लॅमरसच्या बाबतीत या बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना टक्कर देत राहिला आहे.बॉलिवूड नायिकांना कायम टक्कर देण्याची क्षमता असलेला तो घटक म्हणजे बॉलिवूडच्या गायिका.आपल्या सूरांच्या जादूने रसिकांना घायाळ करणा-या आणि रुपेरी पडद्यावर पडद्यामागे राहून बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना आपला आवाज देणा-या गायिकांनी कायमच आपल्या लूकने अभिनेत्रींना टक्कर दिली आहे.बॉलिवूडच्या काही आघाडीच्या गायिकांचा लूक पाहून तुम्हाला विचार करावा लागेल की त्यांच्या सूरांची जादू अधिक आहे की त्यांचं सौंदर्य अधिक आकर्षित करणारं आहे.अशाच काही ग्लॅमरस आणि बोल्ड गायिका कोण आहेत ते जाणून घेऊया मोनाली ठाकूर 'सवाँर लू' या गाण्यानं रसिकांना वेड लावणारी गायिका म्हणजे मोनाली ठाकूर.आपल्या सूरांच्या जादूसह आपल्या ग्लॅमरस अंदाजानेही मोनालीने रसिकांना वेड लावले आहे. ये मोह मोह के धागे या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणा-या मोनालीच्या सौंदर्याची कायमच चर्चा होत असते.छोट्या पडद्यावरील 'रायझिंग स्टार्स' या रियालिटी टीव्ही शोमध्ये तिने एक्स्पर्ट म्हणून भूमिका निभावली आहे.कनिका कपूर 'बेबी डॉल में'.... आणि 'चिट्टीया कलाईंया'... या हिट गाण्यांच्या माध्यामातून कनिकानं रसिकांची मनं जिंकली आहेत. हॉटनेसच्या बाबतीत कनिका बॉलिवूडच्या कोणत्याही अभिनेत्री कडवी टक्कर देईल.नेहा भसीन ऑल गर्ल पॉप ग्रुप ‘वीवा’ची सदस्य असणारी नेहा भसीन एक मॉडेल, गायिका,गीतकार आणि परफॉर्मर म्हणून प्रसिद्ध आहे.सुल्तान सिनेमातील जग घुमया आणि धुनकी... अशी एकाहून एक सरस गाणी तिने दिली आहेत.मॉडेलिंगची पार्श्वभूमी असल्याने नेहाचा हॉट आणि सेक्सी अंदाज तिच्या फॅन्ससाठी कायमच चर्चेचा विषय असतो.नीती मोहन 'तुने मारी एंट्री', 'जिया रे' आणि 'इश्कवाला लव्ह' अशी एकापेक्षा सुरेल गाण्यांनी रसिकांचं मन मोहून घेणारी गायिका म्हणजे नीति मोहन.तरुणाईमध्ये नीती प्रसिद्ध आहे. सूरांच्या जादूसोबत तिचा ग्लॅमरस लूक म्हणजे एक परफेक्ट पॅकेज म्हणावे लागेल.अनुष्का मनचंदा बॉलिवूडच्या बोल्ड गायिकांमध्ये जिचं नाव प्रामुख्याने घेतले जातं ती म्हणजे अनुष्का मनचंदा. आपल्या मादक अदा आणि लूकनं घायाळ करणा-या अनुष्कानं अनेक प्रसिद्ध गाण्यांना आपला सुरेल आवाज दिला आहे. बेजुबान फिर से, डान्स बसंती अशा गाण्यांना तिनं आपला आवाज दिला आहे.'दुल्हा मिला गया' आणि 'लायन्स ऑफ पंजाब' अशा अनेक सिनेमात तिनं आपल्या अभिनयाची जादूही दाखवली आहे. डान्स रियालिटी शो झलक दिखला जामध्येही ती झळकली होती.सोना महापात्रा जितका वेगळा आवाज तितकाच अनोखा अंदाज अशी ओळख असणारी बॉलिवूडची गायिका म्हणजे सोना महापात्रा.'जिया लागे ना' आणि 'अंबरसरीया' अशी एकाहून एक सरस गाणी तिने आपल्या सूरेल आवाजाने लोकप्रिय केली आहेत. सोना महापात्रा एक उत्तम स्टेज परफॉर्मरसुद्धा आहे. आपल्या मनात येईल ते रोखठोकपणे मांडण्यात ती मागे पुढे पाहात नाही. सोनानं संगीत दिग्दर्शक राम संपत यांच्याशी लग्न केलं आहे.मोनिका डोगरा ब्रेक के बाद या सिनेमातील दूरियाँ.... या गाण्यापासून आपल्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात करणारी गायिका म्हणजे मोनिका डोगरा. तिचे सूर जितके पक्के तितक्याच तिच्या अदाही घायाळ करणा-या अशाच आहेत. मोनिकानं विविध रॉक शोमध्येही परफॉर्म केले आहे.आमिर खानच्या धोबीघाट आणि डेविड अशी सिनेमात तिनं अभिनयाची झलकही दाखवली आहे.श्रेया घोषाल बॉलिवूडच्या सध्याच्या आघाडीच्या गायिकांमध्ये जिचं नाव सगळ्यात अव्वल आहे ती गायिका म्हणजे श्रेया घोषाल.आपल्या सूरांच्या जादूनं राष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कार तिनं आपल्या नावावर केले आहेत.सूरांची पक्की असणा-या श्रेयाचं सौंदर्यही कुणालाही मोहून टाकेल असंच आहे. सूरांच्या जादूसह आपल्या सौंदर्याने श्रेयानं अनेकांना घायाळ केले आहे.आपला बालपणीचा मित्र शिलादित्य मुखोपाध्यायह ती रेशीमगाठीत अडकली आहे.