Join us

बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री दोन मुलांच्या जन्मानंतर आता अभिनयक्षेत्रात करणार कमबॅक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 19:38 IST

गेल्या अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. ती सध्या तिच्या संसारात व्यग्र असल्याने ती खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसतेय.

ठळक मुद्देकाल इन्स्टाग्रामवर जेनेलिया आणि राम पोथिनेनी या दाक्षिणात्य अभिनेत्याचा फोटो पोस्ट करत रितेशने लिहिले आहे की, रेडी 2 साठी तयार...

जेनेलिया डिसूजाने तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने मस्ती, जाने तू या जाने ना, फोर्स यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. जेनेलियाने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जेनेलिया अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. ती सध्या तिच्या संसारात व्यग्र असल्याने ती खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसतेय.

तिने काही दिवसांपूर्वी लय भारी, जय हो, फोर्स 2 या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. जेनेलिया एखाद्या चित्रपटात मुख्य भूमिकेत कधी झळकणार याची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. तिच्या फॅन्ससाठी एक खुशखबर असून ती लवकरच एका चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

जेनेलियाचा काल वाढदिवस होता. तिचा हा वाढदिवस रितेश देशमखने खूपच चांगल्याप्रकारे साजरा केला. त्याने त्याच्या बायकोला सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने ट्वीटद्वारे म्हटले होते की, तुमची सगळ्यात चांगली मैत्रीण तुमची लाईफ पार्टनर होते त्यावेळी तुमचे आयुष्य खूपच चांगले होते. माझ्या बायकोला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा... तू एक खूप चांगली आई असून संपूर्ण कुटुंबाला तू एकत्र बांधून ठेवतेस... पुढील जन्मातही मीच तुझा नवरा बनो... ही देवाकडे नक्कीच प्रार्थना करेन...

 

रितेशनने जेनेलियाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे देखील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काल इन्स्टाग्रामवर जेनेलिया आणि राम पोथिनेनी या दाक्षिणात्य अभिनेत्याचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले आहे की, रेडी 2 साठी तयार...

तर आणखी एका फोटोत राम, जेनेलिया आणि रितेश यांना आपल्याला एकत्र पाहायला मिळत असून आमची संध्याकाळ खास केल्याबद्दल धन्यवाद असे रितेशने रामला म्हटले आहे. 

रेडी या 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात राम आणि जेनेलिया यांनी एकत्र काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामुळे राम आणि जेनेलिया यांना पुन्हा एकत्र पाहाण्यास त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत. रामचा आय स्मार्ट शंकर या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. आता खरंच जेनेलिया आणि राम यांचा रेडी 2 चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतोय का हे काहीच दिवसांत कळेल. 

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुख