गौरी- सुझान पुन्हा एकत्र!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 21:57 IST
गौरी खान आणि सुझान खान एकेकाळी बेस्ट फ्रेन्ड होत्या. एकेकाळी, कारण अलीकडे काही खासगी कारणांमुळे दोघींमध्ये बिनसले होते. बेस्ट ...
गौरी- सुझान पुन्हा एकत्र!!
गौरी खान आणि सुझान खान एकेकाळी बेस्ट फ्रेन्ड होत्या. एकेकाळी, कारण अलीकडे काही खासगी कारणांमुळे दोघींमध्ये बिनसले होते. बेस्ट फ्रेन्ड असताना गौरी व सुझान अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसायच्या, मॅगझीनच्या कव्हरपेझ एकत्र झळकायच्या. शिवाय बिझनेसमध्ये दोघीं पार्टनर होत्या. मध्यंतरी बिनसल्यामुळे बराच काळ दोघीही एकत्र दिसल्या नव्हत्या. पण आता एका आॅनलाईन पोर्टलने केलेल्या दाव्यानुसार, गौरी व सुझान या दोघी मतभेद विसरून पुन्हा एकत्र आल्या आहेत. होय, केवळ एकत्रच नाही तर लवकरच दोघी मिळून मुंबईत एक नवे इंटेरिअर स्टोअर सुरु करणार आहेत. सध्या या स्टोअरचे काम अगदी जोमात सुरु असले तरी कुणालाही त्याचे फोटो घेण्याची परवानगी नाही. जुहूमधील एका बंगल्या हे दुमजली स्टोअर उघडणार आहे. तब्बल वर्षभर शोधा शोध केल्यानंतर गौरी व सुझानला आपल्या नव्या स्टोअरसाठी ही जागा पसंत पडल्याचे कळते. आता याचा शुभारंभ कधी होतो, ते लवकरच दिसेल.