Join us

गेट वे ऑफ इंडियावर बिंधास्त फिरत होती धकधक गर्ल माधुरी,पण कोणीही तिला ओळखले नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 13:04 IST

माधुरी दीक्षित-नेने... बॉलिवूडची धकधक गर्ल... तिचा डान्स, तिची अदा, तिचा अभिनय... तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा. गेल्या अनेक वर्षांपासून ...

माधुरी दीक्षित-नेने... बॉलिवूडची धकधक गर्ल... तिचा डान्स, तिची अदा, तिचा अभिनय... तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री हे बिरुद मराठमोळ्या माधुरीने मोठ्या मानाने मिरवलं आहे. लग्नानंतर माधुरी आपल्या संसारात आणि मुलांमध्ये बिझी झाली. तरीही तिचे सिनेमावरील प्रेम काही कमी झालं नाही. त्यामुळे लग्नानंतरही सिनेमा आणि विविध रियालिटी शोच्या माध्यमातून माधुरी रसिकांच्या भेटीला येत असते.सध्या विविध पार्ट्या, इव्हेंट्स आणि सोहळ्यांमध्येही माधुरीचं दर्शन रसिकांना होत असतं. माधुरीची एक झलक पाहण्यासाठी रसिक आतुर असतात.धकधक गर्ल,तिचं स्मित हास्य कॅमे-यात कैद करण्यासाठी जणू एक स्पर्धाच पाहायला मिळते. मात्र काही दिवसांपूर्वी मुंबईत एक वेगळे चित्र पाहायला मिळालं.धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने मुंबईत फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडली. यावेळी माधुरीने गाठलं ते गेट वे ऑफ इंडिया. यावेळी माधुरी दीक्षित गेट वे ऑफ इंडियाची सैर केली. यावेळी गेट वे ऑफ इंडियासमोर माधुरीने फोटोही काढले. विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळी माधुरी गेट वेवर फिरायला गेली होती. त्यावेळी तिथे अनेक लोक उपस्थित होते. मात्र माधुरीला तिथे कोणीच ओळखू शकलं नाही की काय अशी शंका माधुरीने पोस्ट केलेल्या फोटोवरुन येत आहे. फोटोत माधुरीने गेट वे समोर छानशी पोझ दिली आहे. मात्र त्याचवेळी माधुरीच्या आजूबाजूला असणारे लोक आपापली मजामस्ती करण्यात दंग आहेत. यावेळी माधुरीने समुद्र सफरीचाही आनंद घेतला. तसंच सूर्यास्त पाहण्याचाही मोह ती आवरु शकली नाही. हे सगळे फोटो माधुरीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेट वे ऑफ इंडिया आणि समुद्र हे प्रत्येकाचं आकर्षण. कितीही वेळा इथं आलं तरी ते कमीच अशी पोस्ट तिने केली आहे. या सगळ्या फोटोंना सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाइक्स मिळत आहेत. मात्र प्रत्यक्ष गेट वेवर उपस्थित लोक माधुरीला ओळखू शकले नाही का अशी कुजबूज सुरु झाली आहे.  Also Read: 23 वर्षांनी 'हम आपके है कौन'च्या ऑनस्क्रीन बहिणीही पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर!