घराघरात बाप्पांचे आगमन झालेय. देशभर गणेशाच्या आगमनाची धामधूम सुरू आहे. मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींकडे बाप्पा आलाय. एकता कपूर, शिल्पा शेट्टी सगळ्यांनी हर्षोल्हासात बाप्पांचे स्वागत केले. टीव्ही इंडस्ट्रीच्या अनेक सेलिब्रिटींच्या घरीही धूमधडाक्यात बाप्पा अवतरले. सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पांचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तेव्हा पाहा तर आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या घरचा लाडका बाप्पा...
ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र आणि एकता कपूरच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. जितेन्द्र, तुषार कपूर आणि तुषार कपूरच्या मुलाने बाप्पाचे मनोभावे पूजन केले. एकताने घरच्या बाप्पाचा फोटो शेअर केला आहे.
सलमान खानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा यांनी बाप्पाला घरी आणले.
टीव्ही स्टार शरद मल्होत्रा याच्या घरीही गणेशाचे आगमन झाले.
करण टेकर याच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले.
अभिनेत्री रूबिना दिलेक हिच्या घरीही बाप्पा थाटात विराजमान झालेत.