Ganesh Chaturthi-2017 : संजय दत्त, विवेक ओबेरॉयच्या घरी बाप्पाचे उत्साहात स्वागत...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 10:48 IST
घरोघरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरु असताना, बॉलिवूड स्टार्सच्या घरीही बाप्पा अवतरले आहेत. अभिनेता संजय दत्त आणि विवेक ओबेरॉय ...
Ganesh Chaturthi-2017 : संजय दत्त, विवेक ओबेरॉयच्या घरी बाप्पाचे उत्साहात स्वागत...!
घरोघरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरु असताना, बॉलिवूड स्टार्सच्या घरीही बाप्पा अवतरले आहेत. अभिनेता संजय दत्त आणि विवेक ओबेरॉय यांच्या घरी बाप्पाचे आगमन झालेय. दोघांच्याही घराच्या उंबरठ्यावर बाप्पाचे उत्साहात स्वागत झाले.देशभर विविध ठिकाणी गणेशोत्सव उत्साहात साजरा होता. बॉलिवूडचे अनेक कलाकारही हा सण उत्साहात साजरा करतात. विवेक ओबेराय,संजय दत्त, सलमान खान , हृतिक रोशन यापैकीच काही कलाकार. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सर्वांच्या घरी बाप्पाचे आगमन झालेत. यापैकी विवेक व संजय यांच्या घराच्या बाप्पाच्या आगमनाचे काही फोटो आमच्या हाती लागले आहेत. संजय दत्तचे म्हणाल तर यंदाचा गणेशोत्सव त्याच्यासाठी खास आहे. कारण दीर्घकाळानंतर संजय मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. त्याचा ‘भूमी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात एक गणेश आरतीही आहे. संजयचे स्वत: ही आरती गायली आहे. बाप्पाची आरती गाण्याचा हा अनुभव अलीकडे संजयने शेअर केला होता. ‘या चित्रपटातील गणेश आरती, चित्रपटाचा एक खास भाग आहे. मी गायक नाही. पण मी हे गाणे गायले. ते गात असताना चांगले गाण्याचा मी मनापासून प्रयत्न केला आहे. अर्थात मी काहीसा नर्व्हस होतो. पण बाप्पाचे आशीर्वाद माझ्यासोबत होते. बाप्पाची ही आरती गायला मिळणे, हा मला मिळालेला बाप्पाचा आशीर्वाद आहे, असे मी मानतो. प्रेक्षकांनाही ही आरती, हे गाणे नक्की आवडेल, असे मला वाटते, ’ असे संजय म्हणाला होता. ALSO READ : बाप्पाची ही गाणी ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘गणपती बाप्पा मोरया...’विवेकसाठीही हा गणेशोत्सव खास आहे. कारण यंदा विवेक तामिळ फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केलाय. ‘विवेगम’ या तामिळ चित्रपटात विवेक आहे आणि या चित्रपटाला प्रचंड चांगली ओपनिंग मिळाली आहे.