Join us  

चित्रपटासाठी वजन वाढवणं कंगनाला पडलं महागात; निर्माण झाल्या शारीरिक समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:11 PM

Kangana ranaut: जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाला तिच्या शरीररचनेत थोडा बदल करणं गरजेचं होतं.त्यामुळेच या भूमिकेसाठी तिने तिचं २० किलो वजन वाढवलं होतं.

ठळक मुद्दे'थलायवी'नंतर कंगना लवकरच 'धाकड' या चित्रपटात झळकणार आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. नुकताच कंगनाचा थलायवी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगनाने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली असून तिची मेहनत या चित्रपटामधून दिसून येत आहे. मात्र, या आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कंगनाने केलेल्या वर्कआऊटमुळे आता तिला शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाला तिच्या शरीररचनेत थोडा बदल करणं गरजेचं होतं.त्यामुळेच या भूमिकेसाठी तिने तिचं २० किलो वजन वाढवलं होतं. परंतु, हे वजन वाढल्यामुळे तिला शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. 

माझी तुझी रेशीमगाठ: 'अपने पास बहोत पैसा है' म्हणत मायलेकीने केलं क्यूट फोटोशूट

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या कंगनाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. यात एका फोटोमध्ये तिचं वाढलेलं वजन दिसून येत आहे."६ महिन्यात मी २० किलो वजन वाढवलं होतं आणि आता  या ६ महिन्यात मी सारं काही गमावलं आहे. तेही अगदी वयाच्या ३० व्या वर्षी. मला अनेक शारीरिक व्याधी जडल्या आहेत. मुळात यापूर्वीच मला स्ट्रेसची समस्या होती", असं कॅप्शन कंगनाने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, 'थलायवी'नंतर कंगना लवकरच 'धाकड' या चित्रपटात झळकणार आहे. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट असून त्याचं दिग्दर्शन रजनीश घई यांनी केलं आहे.  या चित्रपटात कंगना 'एजंट अग्नी' ही भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि शरीब हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट बाल तस्करीवर आधारित आहे. 

टॅग्स :कंगना राणौतथलायवीसेलिब्रिटीसिनेमा