Join us

अजय-काजोलवर अमेरिकन चाहत्यांचा रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 12:40 IST

‘शिवाय’ चित्रपटाच्या प्रचारार्थ अजय देवगन सपत्नीक अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये त्यांनी गुगल, फेसबुक अशा इंटरनेट कंपन्यांच्या मुख्यालयाला भेटी दिल्या. तेथील ...

‘शिवाय’ चित्रपटाच्या प्रचारार्थ अजय देवगन सपत्नीक अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये त्यांनी गुगल, फेसबुक अशा इंटरनेट कंपन्यांच्या मुख्यालयाला भेटी दिल्या. तेथील कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या. सर्व काही सुरळीत चालू असताना त्यांच्या दौऱ्याला मात्र गालबोट लागले. अजय-काजोल एका कार्यक्रमात सामान्य चाहत्यांशी संवाद साधणार होते. काजोलशी प्रत्यक्षात बोलायला मिळणार म्हणून अनेक फॅन्सनी अव्वाच्या सव्वा दरात या कार्यक्रमाचे तिकिट खरेदी केले.मात्र ऐनवेळी संयोजकांनी हा कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगितले आणि उपस्थित चाहत्यांच्या संयम सुटला. त्यांनी आयोजकांना शिवीगाळ करून पैसे परत करण्याची मागणी केली. काही कर्मचाऱ्यांना मारहाणदेखील करण्यात आली.सुत्रांनुसार काजोलची तब्येत ठीक नसल्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला. मात्र चाहते काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. याचा परिणाम म्हणजे पुढील कार्यक्रमांचेसुद्धा लोक पैसे परत मागत आहेत.