अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) ११ ऑगस्ट रोजी त्याचा ६४वा वाढदिवस साजरा करतो आहे. सुनील शेट्टीने हिंदी सिनेसृष्टीत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अभिनेता लवकरच 'हेराफेरी ३' मध्ये दिसणार आहे. बॉलिवूडच्या अण्णाला एकेकाळी त्याचे मित्र त्याला जोकर म्हणायचे. याबद्दल सुनील शेट्टीने एका मुलाखतीत खुलासा केला होता.
सुनील शेट्टी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा काही मोजक्या अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांना अॅक्शन हिरो म्हणून ओळखले जात असे. त्याच्या पहिल्या चित्रपट बलवानमध्ये त्याच्या उत्तम फिटनेस आणि अॅक्शन सीक्वेन्सने सर्वांचे मन जिंकणाऱ्या सुनीलला त्याच्या मित्रांनी जोकरचा टॅग दिला होता. याचे कारण १९९४ मध्ये आलेला त्याचा हिट चित्रपट 'गोपी किशन' होता. खरंतर 'गोपी किशन'च्या रिलीजदरम्यान सुनील शेट्टीने 'लेहरेन जे रेट्रो'ला एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्याचे गोपी पात्र खूप मजेदार दाखवण्यात आले होते आणि पहिल्यांदाच सुनील अॅक्शन अवतारातून कॉमेडीकडे वळला होता.
'गोपी किशन'मध्ये अभिनेत्याची होती दुहेरी भूमिका
सुनील शेट्टी म्हणाला होता की, ''मला या चित्रपटातील गोपीची भूमिका वैयक्तिकरित्या आवडली. फक्त मलाच नाही तर माझ्या मित्रांनाही ही भूमिका आवडली. माझे कॉमिक टायमिंग पाहून ते मला जोकर म्हणायचे. हा खरोखरच एक वेगळा अनुभव होता कारण अॅक्शन हिरो म्हणून ओळखल्यानंतर, कॉमेडीमध्ये माझा प्रवेश मनोरंजक होता. गोपी एक पोलीस आहे आणि तरीही, त्याचे पात्र खूपच मजेदार आहे. मुकेश दुग्गल दिग्दर्शित या विनोदी चित्रपटात सुनीलने दुहेरी भूमिका साकारली होती.''
या चित्रपटांमध्ये दिसणार सुनील शेट्टीसुनील शेट्टी गेल्या ३ दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून सक्रीय आहे. जर आपण त्याच्या आगामी चित्रपटांवर नजर टाकली तर त्यात हेरा फेरी ३ आणि वेलकम टू द जंगल यांचा समावेश आहे.